दुरांतो एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची लुट

राजेंद्र पाटील
शुक्रवार, 20 जुलै 2018

नांद्रा (पाचोरा ) : माहेजी स्टेशनपासून एक कि.मी.अंतरावर आज (ता.20) रात्री अडीचच्या सुमारास जळगावकडून मुंबईकड़े जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला माहेजी स्टेशनजवळ रोखून प्रवाशांची लूट करण्यात आली. 

माहेजीपासुन 1 कि.मी.अंतरावर असलेल्या पोल क्र.388 12/14 च्या मध्ये असलेल्या होम सिंग्नल क्र. एम.वाय.जे.एस-2 या सिंग्नलचा लाँक तोडून गाडी क्र 12290 नागपुर वरून मुंबई सीएसटीकडे जाणारी दुरांतो एक्प्रेस थांबवुन खिडकीतून महिलांसह इतर प्रावाशांना लुटल्याची घटना घडली. प्रवाशांच्या अंगावरील सोने लूटले असल्याची तक्रार इगतपूरीला तसेच मुबई व इतर ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे.

डि.वाय.एस.पी.केशव पातोंड म्हसावद पोलिसांनी याप्रकरणी पहाणी केली. जिआरपीएफ पोलिस निरिक्षक दिलीप गडरी पुढील तपास करत आहे.या घटनेमुळे माहेजी स्टेशनला रात्री 2 वाजे पासून छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Web Title: Loot of passengers in Duranto Express