दुष्काळाने शेतकऱ्यांसह आदिवासी फोडताहेत टाहो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नाशिक - दुष्काळाचा वणवा सर्वदूर पेटला असून, शेतकऱ्यांसह आदिवासी टाहो फोडताहेत. 15 पैकी 10 तालुक्‍यांत पावसाने ओढ दिलेली असताना आदिवासी पट्ट्यात जमिनीतील ओल दोन महिने आधीच संपुष्टात आल्याने पिकांमध्ये दाण्याचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे थंडीऐवजी ढगाळ हवामानाने हरभरा आणि गव्हाला 55 टक्‍क्‍यांहून अधिक दणका बसणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जिल्ह्यातील आदिवासी भागातील 5 तालुक्‍यांत पाऊस झाल्याची आकडेवारी प्रशासनातर्फे नाचवली जातेय. पण ही आकडेवारी पोकळ ठरली. या भागात जुलै-ऑगस्टचा पाऊस पिकांसाठी महत्त्वाचा असतो, धरणे भरतात. सप्टेंबरच्या पावसाने जानेवारीपर्यंत जमिनीत ओल टिकते. प्रत्यक्षात मात्र ऑगस्ट-सप्टेंबरला सहा दिवस अन्‌ तोही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे जमिनीतील ओल गेल्या महिन्यात संपुष्टात आली. याखेरीज पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केल्याने प्रशासनाला 101 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच, 98 आत्महत्यांनी कृषी पंढरी काळवंडली आहे. 

केंद्रीय पथकाचा आज-उद्या दौरा 
राज्यात सरकारने 151 तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर झाला असून, दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी उद्या (ता.6) केंद्र सरकारचे पथक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व सिन्नर तालुक्‍यातील प्रत्येकी दोन-दोन गावांची पाहणी करणार आहे. केंद्रीय पथक दुष्काळी गावात पीक परिस्थिती, भूजल पातळी, टॅंकरची माहिती घेईल. उद्या दुपारी लळींग (जि.धुळे) येथून जळगाव (निंबायती, ता. मालेगाव) येथे येईल. साडेचारला हे पथक मेहुणे (ता. मालेगाव) येथे पोचेल. शुक्रवारी (ता.7) हे पथक मुसळगाव आणि केदारपूर (ता. सिन्नर) येथील दुष्काळाची पाहणी करणार आहे.

Web Title: Loss of tribal people with farmers due to drought