वणी गडावर चैत्रोत्सवानिमित्त उसळला भाविकांचा महापूर

wani
wani

वणी (नाशिक) : 'अंबे माते की', 'सप्तशृंगी माता की जय', 'जय माताजी, अष्टभुजा वाली की जय' या जयघोषाने व डीजेवरील "डोंगर हिरवागार, माय तुना डोंगर हिरवागार, जतरा भरनी चैत्र मझार, माय तुना डोंगर हिरवागार‘ अशा विविध आहिराणी गाण्यांच्या निनादात भगवे झेंडे हाती घेतलेले चार पाच वर्षांच्या मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत तीन लाखांवर भाविक रणरणत्या उन्हात गडाकडे मार्गक्रमन करीत आहे. तर दीड लाखांवर भाविक गडावर दाखल झाले आहे.  दरम्यान उद्या (ता. ३०) मध्यरात्री लाखो भाविकांच्या साक्षीने गडाच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकणार अाहे. 

खानदेशाची माहेरवाशिण समजली जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र महिन्यातील यात्रेसाठी खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह कसमा भागातील दोन लाखांवर भाविक सप्तश्रृंगी गडापासून अवघ्या १० ते २० किमीच्या परीसरात दाखल झाले असून रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहात आहे. पैकी दीड लाखांवर भाविक गडावर दाखल झाले असून देवीचरणी मस्तक होण्यासाठी आज पहाटे पासून मंदीराच्या पायऱ्यांवर बाऱ्या लागल्या आहेत. आज सकाळी देवीच्या अलंकाराची न्यासाचे इस्टेट कस्टडीयन प्रकाश पगार यांच्या मार्गदर्शनाखाली देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत न्यासाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह हजारो भाविकांनी सहभाग घेतला. आज सकाळी ८ ते ९ या वेळेत देवीची पंचामृत महापूजा आैरगांबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संगितराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कल्याण महानगर पालिकेच्या माजी महापूर कल्याणी पाटील व न्यासाचे अधिकारी उपस्थित होते. 

आजपासून सलग चार दिवस सुट्टी असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाविकांची आज सकाळपासूनच गर्दी उसळली. त्यामुळे  आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. सकाळी ९ वाजेपासून भाविकांची गर्दीत वाढ होवून मंदिर ते पहिली पायरीदरम्यान सोळा ठिकाणी बाऱ्या लावून टप्प्याटप्प्याने भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते. एका मिनिटात सर्वसाधारण  ७० भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. नांदुरी ते सप्तशृंगगड दरम्यान दर पाच ते दहा मिनिटांत एक बस सोडण्यात येत होती. उद्या, ता. ३० 

चतुर्दशी हा चैत्रोत्सवातील मुख्य दिवस असल्याने तसेच उद्या गडावर कीर्ती ध्वजाची मिरवणूक संपन्न होत असल्याने या सोहळ्यास उपस्थित राहाण्यासाठी गडावर भाविकांची

उच्चांकी गर्दी होणार असून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पायी येणाऱ्या भाविकांना नांदुरी ते गड यादरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. न्यासातर्फे भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली असून, आज दिवसभरात ३०  हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गर्दीमुळे कळवण ते नांदुरी व नाशिक ते वणी मार्गावरील वाहतूक धीम्यागतीने होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com