जवान अर्जुन वाळुंज अमर रहे...अखेरच्या निरोपासाठी लोटला जनसागर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

अमर रहे.अमर रहे..‘अर्जुन’ अमर रहे...,जब तक सुरज चांद रहेगा, अर्जुन तेरा नाम रहेगा, भारत माता कि जय, वंदे मातरम्...वंदे मातरमच्या जय घोषाने चांदवड तालुक्यातील भरवीर गावासह पंचक्रोशी दणाणून गेले. भरवीर येथील लष्करात असलेला जवान अर्जुन प्रभाकर वाळूंज (२८) यांस अखेरचा निरोप देण्यासाठी मंगळवार (ता.२२) रोजी जनसागर उसळला होता.

गणुर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्हयातील तेंगा येथे भरवीरचा भूमीपुत्र अर्जुन प्रभाकर वाळूंज यांचा शनिवार (दि.१९) रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव देवळाली कॅंम्प येथून भरवीर येथे मंगळवार (दि.२२) सकाळी ८ वाजेच्या सुमारास आणण्यात आलेचांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर वाळूंज यांस अखेरचा निरोप देण्यासाठी मंगळवारी (ता.२२) रोजी जनसागर उसळला होता.अर्जुनचे पार्थिव गावात येताच दोन दिवसापासून डोळे लावून बसलेले ग्रामस्थ व वाळूंज कुटुंबीय क्षणभर स्तब्ध झाले अन त्यांनतर वाळूंज कुटुंबीयांनी फोडलेला टाहो उपस्थितांचाही हुंदका अनावर करणारा ठरला. 

अमर रहे...अमर रहे.. अर्जुन वाळुंज अमर रहे...
अमर रहे.अमर रहे.. ‘अर्जुन’ अमर रहे..., जब तक सुरज चांद रहेगा, अर्जुन तेरा नाम रहेगा, भारत माता कि जय, वंदे मातरम्...वंदे मातरमच्या जय घोषाने चांदवड तालुक्यातील भरवीर गावासह पंचक्रोशी दणाणून गेले. यावेळी अर्जुन यांच्या पार्थिवाची गावातून पारंपारिक वाद्यासह रथातून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रा घराजवळ  येताच आई राजूबाई, वडील प्रभाकर, पत्नी पूनम, भाऊ सागर, बहीण योगिता व नातेवाईकांनी अर्जुनच्या नावाचा एकच टाहो फोडल्याने समस्त भरवीरकरांचे ऊर दाटून आले होते. अर्जुनला अखेरचे पाहण्यासाठी भरवीर परिसरातील व तालुक्यातील हजारोचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. सकाळी ११ वाजता लहान भाऊ सागरने भडाग्नी देताच वाळूंज कुटुंबीयाबरोबरच उपस्थितांनाही अश्रूं अनावर झाले होते. यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, नितीन आहेर, कारभारी आहेर, सुनील आहेर, शांताराम ठाकरे, विलास ढोमसे, विजय धाकराव यांच्यासह सामाजिक,राजकीय तसेच प्रशासकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image may contain: 9 people, people standing

भरवीर येथील जवानास अखेरच्या निरोपासाठी अश्रूनयनांनी लोटला जनसागर 

Image may contain: 9 people, people smiling


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lot's of people came for the last message to the soldier