मेहुणीला घेऊन तरुण पसार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

आदर्शनगर परिसरातील शिरसोली नाका पेट्रोलपंपामागे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मेहुणीवर जीव जडला आणि तो पत्नी, दोन मुलांना सोडून मेहुणीला सोबत घेत पसार झाला. परिसरात या घटनेबद्दल अनेक चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित तरुणाची पत्नी दोघा मुलांना घेऊन पोलिसांत दाखल झाली आणि तिने पती हरविल्याची तक्रार नोंदवली.

जळगाव - आदर्शनगर परिसरातील शिरसोली नाका पेट्रोलपंपामागे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मेहुणीवर जीव जडला आणि तो पत्नी, दोन मुलांना सोडून मेहुणीला सोबत घेत पसार झाला. परिसरात या घटनेबद्दल अनेक चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित तरुणाची पत्नी दोघा मुलांना घेऊन पोलिसांत दाखल झाली आणि तिने पती हरविल्याची तक्रार नोंदवली. 

संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तिचा पती विनोद राजमल चव्हाण (वय ३०) रविवारी (ता. ३०) सकाळी साडेदहाला रायसोनीनगरात राहणाऱ्या तिच्या बहिणीसोबत दुचाकीवर सोबत जाताना दिसले. नंतर दिवसभर घरी परतले नाहीत. दोघांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता विनोदने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला असून, नातलग मित्रमंडळींकडे शोध घेऊन माहिती मिळाली नाही. त्यामुळे या विवाहितेने कुटुंबीयांसह पोलिस ठाणे गाठले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. 

दोन मुलांचा बाप 
विनोद चव्हाण याचा लक्ष्मीसोबत विवाह झाला असून, त्यांना सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा आहे. तर त्याच्या मेव्हणीने नुकतेच अठरा वर्षे पूर्ण केलेले असून, दोघेही रविवारी सकाळी विनोदच्या शालकाची दुचाकी (एमपी ६८, एमसी १५५९) घेऊन पसार झालेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Girl Youth Crime Husband Missing Complaint