प्रेमविवाह केलेल्या मुलीकडून पाच लाखांसाठी बापाचा छळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जळगाव - प्रियकरासोबत पळून जात प्रेमविवाह केल्यानंतर धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या मुलीने पित्याला अक्षरश: रडकुंडीस आणले आहे. मालवाहू गाडी व पाच लाख रोख, तसेच मालमत्तेत वाटा देण्याच्या मागणीसाठी ही मुलगी व तिचा पती त्रास देत असल्याची तक्रार पीडित पित्याने थेट पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.  

सिंधी कॉलनीतील रहिवासी सूरज अर्जुनदास लुल्ला यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे की, सीएचे शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी १९ मार्चला महाविद्यालयातून परीक्षेची रिसीट घेऊन येते असे सांगून गेली. तासाभरातच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातून फोन येऊन मुलीने लग्न केले असून तुमच्याविरुद्ध तिचा तक्रारी अर्ज असल्याचे सांगण्यात आल्याने एकच धक्का बसला. कुटुंबीय पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी मुलीच्या विनवण्या केल्या मात्र उपयोग न झाल्याने, त्यांनी माघार घेत तिच्याशी काहीही संबंध नाही असे सांगून घरी परतले. 

मुलीकडून पैशाची मागणी
आता मात्र, त्याच मुलीकडून पैशांसाठी त्रास दिला जात आहे. मुलीने घरून जाताना दीड लाख रुपये रोख, ५ ग्रॅमचे कानातील टॉप्स, १५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ग्रॅमची सोन्याची अंगठी, १० ग्रॅमची चेन नेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मालमत्तेत हवा वाटा-हिस्सा 
मुलीने फोन करून सुरवातीला मालवाहू गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती, पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ केल्याची तक्रार औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दाखल असून आता तिने चक्क पाच लाख रुपये आणि मालमत्तेत वाटा हवा असल्याचे सांगत आई-वडिलांना शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी मुलगी व तिच्या पतीने दिली आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी पीडित पित्याने या अर्जाद्वारे केली आहे.

Web Title: love marriage 5 lakh demand crime