प्रेमविवाह केल्याने वैदू समाजातील दाम्पत्याला टाकले वाळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

मालेगाव - प्रेमविवाह केल्याने मळगाव ( ता. बागलाण ) येथील 
दिनेश पवार नामक दाम्पत्याला वैदू समाजाचे जातपंचायतीने वाळीत टाकले आहे. मृत्यूच्या दारातील कॅन्सरग्रस्त बापाची सुश्रुषा देखील करण्यावर बंदी घातली गेलीय. या प्रकाराने जात पंचायत पुन्हा चर्चेत आली. 

मालेगाव - प्रेमविवाह केल्याने मळगाव ( ता. बागलाण ) येथील 
दिनेश पवार नामक दाम्पत्याला वैदू समाजाचे जातपंचायतीने वाळीत टाकले आहे. मृत्यूच्या दारातील कॅन्सरग्रस्त बापाची सुश्रुषा देखील करण्यावर बंदी घातली गेलीय. या प्रकाराने जात पंचायत पुन्हा चर्चेत आली. 

प्रगत बागलाण तालुक्यात जात पंचायतीसारख्या बुरसटलेल्या मनोवृत्त्ती चिंतेची बाब आहे. दिनेशने नववर्षाच्या प्रारंभी समाजातीलच तरूणीशी विवाह केला. वैदू समाजाने या दोघांना समाजातून वाळीत टाकले आहे. या प्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी गावातल्या जातपंचायतीने या कुटुंबावर दबाव टाकला. कॅन्सरग्रस्त वडिलांनाही उपचारासाठी आणि भेटण्यासही मज्जाव केला. 

पवार कुटुंब ऐकत नाही म्हटल्यावर जात पंचायतीने या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केलंय. हे कुटुंब सध्या दहशतीखाली वावरत आहे. काही महिन्यांपूर्वी दिनेश पवार याने त्याच्याच समाजाच्या म्हणजे वैदू समाजातील मुलीशी लग्न केले. प्रकरण ज्यावेळी गावातल्या जात पंचायतीसमोर पोहोचलं तेव्हा जातीचा अपमान व्हायला नको म्हणून त्यांना वाळीत टाकण्यात आलं. दमदाटी देत मुलीच्या बापाकडून व मुलाच्या कुटुंबाकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेण्यात आले. गावात राहायचे नाही असे सांगण्यात आलं. यावेळी  या परिवाराला जातीबाहेर ठेवण्याचा फतवा काढण्यात आला. नातेवाईकांचे लग्न व सु:ख दुःखाच्या प्रसंगात जाण्यास मज्जाव करण्यात आला. 

जात पंचायतीने बहिष्कार टाकल्यानंतर पीडित दिनेश आणि त्याच्या पत्नीने मालेगावातील महिला समुपदेशन केंद्रात पंचायतीच्या सदस्यांविरोधात तक्रार केलीय. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात माहिती पाठवून नोंद करण्यात आली आहे.

दिनेश पवार या तरूणाने मालेगावी तक्रार दिली आहे. अपर अधिक्षकांनी यातील संशयीतांना चौकशीसाठी मालेगावी पाठविण्यास सांगीतले आहे. 
- हिरालाल पाटील, पोलिस निरीक्षक, सटाणा पोलिस ठाणे.

Web Title: Love marriage Vaidu Society jatpanchyat crime