लोंढ्रीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पहूर/वाकोद (ता. जामनेर) - लोंढ्री खुर्द (ता. जामनेर) येथील प्रेमीयुगुलाने मोतीआई धरणाजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी आठला उघडकीस आली. गळफास घेतलेल्या मुलांना पाहून दोघांच्याही नातेवाइकांनी हंबरडा फोडला. 

मृतांची नावे अक्षय गजानन चौधरी आणि पूनम आनंदा चौधरी अशी आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

अक्षय गजानन चौधरी (वय १९) हा वाकोद येथील गौराई कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर पूनम आनंदा चौधरी (वय १६) हिने पहूर येथे नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी (ता. १०) रात्री एकपर्यंत अक्षयने गावात गुरांची कुट्टी (चारा) भरण्याचे काम केल्याचे सांगण्यात आले. धरणावर जाणाऱ्या एका व्यक्तीला दोघांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. समाधान शंकर चौधरी यांच्या माहिती वरून पोलिसांनी पंचनामा केला. गळफास घेण्यापूर्वी दोघांनी विष घेतल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी विषारी कीटकनाशकांच्या दोन तीन बाटल्या व दोन मोबाईल आढळले.

मृतांचे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले व आज दुपारी दोनला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहाय्यक फौजदार अनिल अहिरे व जितेंद्र परदेशी तपास करीत आहेत.

Web Title: lovers suicide in londhri