पांढरे सोनं कवडीमोल..शेतकऱ्यांत नाराजीचा सूर   

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

तालुक्‍यातील उत्तर- पूर्व भागात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तीन वर्षांपासून दुष्काळ, बोंडअळी यांच्या फेऱ्यात हे पीक अडकल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. यंदा सुरवातीला कापसाचे उत्पादन चांगले येईल, ही आशा निर्माण झाली. पण नंतरच्या काळात अतिपावसाने पत्त्यांची गळ मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडांना अपेक्षित बोंडे लागली नाहीत. त्यात अनेक ठिकाणी कपाशीची पाने लाल होऊन वाढ थांबली. इतरत्रही अतिपावसाने कपाशीचे नुकसान झाल्याने कमी उत्पादन मिळणार असल्याने चांगला भाव मिळेल, ही शेतकऱ्यांत आशा निर्माण झाली. पण सुरवातीलाच पाच वर्षांतील नीचांकी पातळीवरील दर सध्या मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला.

नाशिक : येवले तालुक्‍यातील सायगाव परिसरातील गावात कापूस वेचणीस सुरवात झाली असून, गावोगावी अनेक व्यापारी कापूस खरेदी करत आहेत. मात्र क्विंटलला चार हजार ४०० रुपयांपर्यंतच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे. तसेच हा दर गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी दर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्‍यातील उत्तर- पूर्व भागात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तीन वर्षांपासून दुष्काळ, बोंडअळी यांच्या फेऱ्यात हे पीक अडकल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. यंदा सुरवातीला कापसाचे उत्पादन चांगले येईल, ही आशा निर्माण झाली. पण नंतरच्या काळात अतिपावसाने पत्त्यांची गळ मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडांना अपेक्षित बोंडे लागली नाहीत. त्यात अनेक ठिकाणी कपाशीची पाने लाल होऊन वाढ थांबली. इतरत्रही अतिपावसाने कपाशीचे नुकसान झाल्याने कमी उत्पादन मिळणार असल्याने चांगला भाव मिळेल, ही शेतकऱ्यांत आशा निर्माण झाली. पण सुरवातीलाच पाच वर्षांतील नीचांकी पातळीवरील दर सध्या मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अतिपावसाने नुकसान झाल्याने एकरी उत्पादनही घटले आहे, अशा स्थितीत हे दर निश्‍चितच परवडणारे नाहीत. 

कापसाला पाच वर्षांतील नीचांकी दर...हमीभाव साडेपाच हजार असूनही व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी 

गेल्या वर्षाच्या दुष्काळी स्थितीने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. आता रब्बीची पिके उभी करण्यासाठी मिळेल त्या भावात कापसाची विक्री केल्याशिवाय पर्यायच राहिला नाही. विशेष म्हणजे शासनाने कापसाला क्विंटलला पाच हजार 550 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यापेक्षा अतिशय कमी दर शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे. तसेच अद्यापही खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने पांढरे सोनं कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. त्यामुळे हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटना युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव व शेतकऱ्यांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Low cotton prices farmers disappointed Nashik Marathi News