जळगाव : नशिराबादला कमी डेसीबलने अजान | latest jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Low decibels of ajan in Nasirabad

नशिराबादला कमी डेसीबलने अजान

नशिराबाद (जि. जळगाव) : नशिराबाद येथे दहा मशिदी आहेत. त्यातील चार ते पाच मशिदींमध्ये कमी डेसीबलने अजान करण्यात आली, अशी माहिती मनसेचे (MNS) जिल्हाप्रमुख मुकुंदा रोटे यांनी दिली. ते म्हणाले, की आम्ही त्याबाबत इशारा दिला होता. मात्र, त्या ठिकाणी सकाळी कमी डेसीबलने अजान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही आंदोलन केले नाही. आम्ही कायदा व सुव्यव्यवस्थेला सहकार्य करीत आहोत.

हेही वाचा: भोंग्यावरून राजकारण चालणार नाही : मंत्री अस्लम शेख

"मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे हे आंदोलन केवळ एक दिवसाचे नाही. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील."
-मुकुंदा रोटे, जिल्हाप्रमुख मनसे

हेही वाचा: Malegaon : हनुमान चालिसा पठणासाठी तुर्तास कुणाचाही अर्ज नाही

Web Title: Low Decibels Of Ajan In Nasirabad In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top