निकृष्ट रस्ता कामाची पोलखोल

निकृष्ट कामाची पोलखोल
निकृष्ट कामाची पोलखोलesakal

तळोदा (नंदुरबार) : शहरातील हुतात्मा चौक ते कॉलेज चौफुलीपर्यंत होत असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल परिसरातील नागरिकांनी एकत्र येत केली. नागरिकांच्या आक्रमक पवित्रानंतर रस्त्यावरील डांबरीकरणाचे ते काम पुन्हा एकदा करण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रस्त्याच्या या निकृष्ट कामाबाबतचे टाकलेले व्हिडीओ व फोटोंबाबत शहरात एकच चर्चा होत आहे.

तळोद्यातील हुतात्मा चौक ते कॉलेज चौफुलीपर्यंत रस्ता रुंदीकरण, दुभाजक, फुटपाथ व गटार बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, या कामातील फोलपणा व ठेकेदाराच्या निकृष्ट कामाच्या नमुना परिसरातील नागरिकांनी एकत्र येत उघडकीस आणला आहे. या रस्त्यावरील माती, धूळ न उचलताच, आहे त्या स्थितीत डांबरीकरण करण्याचा प्रताप करण्यात येत होता. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच नागरिक एकत्र आले व त्यांनी थातुरमातूर होत असलेल्या या कामाबाबत आवाज उठविला. तसेच झालेल्या कामांची चित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामध्ये रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, हे सर्वांना दिसून आले.

या सर्व प्रकाराबाबतची माहिती भाजपचे शहराध्यक्ष तथा प्रभाग एकच्या नगरसेविका भाग्यश्री चौधरी यांचे पती योगेश चौधरी यांना मिळताच ते त्याठिकाणी आले व त्यांनी ठेकेदाराला कामाबाबत खडे बोल सुनावले. दरम्यान, रस्ता शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असून, रहदारीसाठी नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी सर्वांत जास्त साचत असते. शहरातील सर्वांत जास्त पाणी असणारा हाच मुख्य रस्ता असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे संबंधित ठेकेदार, नगरपालिका प्रशासन साफ दुर्लक्ष करीत असल्याचे एकंदरीत चित्र या घटनेवरून उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

निकृष्ट कामाची पोलखोल
Dhule : लाचखोर अव्वल कारकूनला पोलिस कोठडी

दोन कोटी ३८ लाखांचे काम
हुतात्मा चौक ते कॉलेज चौफुलीदरम्यान करण्यात येणारे हे काम सुमारे दोन कोटी ३८ लाख रकमेचे आहे. यापूर्वी शहराच्या पूर्वेला शहादा रस्ता, दक्षिणेला हातोडा रस्ताचे काम झाले असल्याने सर्वांचे लक्ष शहराचा उत्तरेकडे सुरू असलेल्या या कामाकडे आहे. मात्र, इतकी मोठी रक्कम खर्च करूनही कामाचा दर्जा राखला जात नसेल, तर याला काय म्हणावे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगत आहे.

जागरूक नागरिकांचे कौतुक
रस्त्याच्या होणाऱ्या निकृष्ट कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन कामाला विरोध केला व काम पुन्हा एकदा करण्यास यंत्रणेला भाग पाडले. त्यामुळे परिसरातील जागरूक नागरिकांचे कौतुक होत आहे. शहरातील इतर नागरिकांनीही हा आदर्श घेत निकृष्ट कामांना विरोध केला पाहिजे, असे यानिमित्ताने चर्चिले जात आहे.

निकृष्ट कामाची पोलखोल
धुळे पोलिसांचा रिक्षाचालकांना दणका; 50 जणांवर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com