महिलेच्या पोटातून काढला नऊ किलोचा गोळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

धुळे : हेंद्रुण (ता.धुळे) येथील तीस वर्षीय महिलेच्या पोटातून नऊ किलोचा गोळा शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. जवाहर मेडिकल फाउंडेशनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेला जीवदान दिले.

धुळे : हेंद्रुण (ता.धुळे) येथील तीस वर्षीय महिलेच्या पोटातून नऊ किलोचा गोळा शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. जवाहर मेडिकल फाउंडेशनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेला जीवदान दिले.

हेंद्रुण येथील चित्रकला जामसिंग ठाकरे (वय 30) काही दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त होती. विविध ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडत नव्हता. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याइतकी आर्थिक कुवत नसल्याने काही दिवसांपूर्वी ती जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर तिच्या पोटात मांसाचा गोळा वाढत असल्याचे आढळले.

कुटुंबीयांच्या संमतीनंतर काही दिवस उपचार करून शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर चित्रकला यांच्या पोटातून गोळा काढण्यात आला. त्याचे वजन नऊ किलो असून, वैद्यकीय क्षेत्रातही त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. डॉ. कैलास गिंदोडिया, डॉ. तुषार पवार, डॉ. मनोज कोल्हे, डॉ. सुशील भदाणे, डॉ. आदित्य मानेकर, डॉ. आग्रेज, डॉ. विनीत मिश्रा, डॉ. धरती केला, डॉ. कारगे यांनी ही शस्त्रक्रिया केली.

रक्तदानासह वैद्यकीय सुविधा
चित्रकला ठाकरेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व सोयीसुविधा तिला मोफत उपलब्ध करून दिल्या. फाउंडेशनमधील शस्त्रक्रिया विभागाचे सहाय्यक सुधाकर बोरसे, महेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, परिचारिका दीपा यांनीही सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते गोकूळ राजपूत यांनी दोन बाटल्या रक्त उपलब्ध करून दिले. यशस्वी शस्त्रक्रियाही केल्याने ठाकरे कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: lump of 9 kg removed from woman's stomach

टॅग्स