साठ वर्षांवरील ज्येष्ठांना जेवणाचे डबे मोफत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

जळगाव ः समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक असे आहेत ज्यांना अपत्ये नाहीत. उतार वयात त्यांना घरी भोजन तयार करता येत नसल्याने जेवणासाठी भीक मागायची वेळ येते. काही घरचे चांगले असूनही त्यांना मुले वागवत नाहीत अशा अशा ज्येष्ठांसाठी जेवणाचे मोफत डबे पुरवून त्यांची दोन वेळची भूक भागविण्याचा उपक्रम येथील "बॉक्‍स ऑफ हेल्प ग्रुप'ने सुरू केला असल्याची माहिती संस्थापिका सुधा काबरा यांनी आज दिली. 

जळगाव ः समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक असे आहेत ज्यांना अपत्ये नाहीत. उतार वयात त्यांना घरी भोजन तयार करता येत नसल्याने जेवणासाठी भीक मागायची वेळ येते. काही घरचे चांगले असूनही त्यांना मुले वागवत नाहीत अशा अशा ज्येष्ठांसाठी जेवणाचे मोफत डबे पुरवून त्यांची दोन वेळची भूक भागविण्याचा उपक्रम येथील "बॉक्‍स ऑफ हेल्प ग्रुप'ने सुरू केला असल्याची माहिती संस्थापिका सुधा काबरा यांनी आज दिली. 

अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपचार घेता येत नाहीत. शासकीय रुग्णालयात उपचार घेतले, तर त्यांच्या भोजनाचे वांधे होतात, जे निराधार आहेत. ज्यांना अपत्य असूनही त्यांचा सांभाळ करीत नाहीत, असे अनेक ज्येष्ठ विविध ठिकाणी लाचार होऊन पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरवीत असल्याचे समाजात दृष्य दिसते. अशा ज्येष्ठांचे सर्व दुःख आपण दूर करू शकत नाही. मात्र त्यांना दोन वेळचे जेवण मोफत देवून त्यांची भोजनाची तृष्णा तर भागवू शकतो. अशी संकल्पना बॉक्‍स ऑफ हेल्प ग्रुपच्या संस्थापिका सुधा काबरा यांना सुचली. त्यांनी आपल्या ग्रुपमधील सदस्यांना ही संकल्पना सांगताच त्यांनीही होकार दिला. कालपासूनच या ग्रुपने आठ डबे ज्येष्ठांना घरपोच दिले आहेत. यावेळी अध्यक्षा काबरा, कविता कराचीवाला,  नीता परमार, चित्रा मालपाणी, स्वाती सोमाणी, मनीषा तोतला, सुलभा लढ्ढा, मीनल लाठी, संगीता मंडोरा, सीमा जाखेटिया, संध्या मुंदडा, डॉ. हेंमागी कोल्हे, प्रमोद झांबरे उपस्थित होते. 

असे शोधणार ज्येष्ठ नागरिक 
ज्येष्ठांना मोफत जेवणाचे डबे हवे असतील तर त्यांनी अध्यक्ष सुधा काबरा ( मो. 9422215674), कविता कराचीवाला (9284147445), नीता परमार (8007780896), चित्रा मालपाणी (7798310021) यांना संपर्क साधावयाचा आहे. या ग्रुपचे सदस्य संबंधितांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन डबे देतील. त्याअगोदर त्या व्यक्तीच्या घरची माहिती घेतील. 

ज्येष्ठांना घरपोच डबे पोचविण्याची ही संकल्पना माझ्या आईपासून घेतली. अनेक ज्येष्ठ निराधार आहेत. त्यांच्यासह इतर ज्येष्ठांना डबे पोचविले जातील. "आजी-आजोबा पाळणा घर' अशी माझी संकल्पना आहे. तिची ही पहिली पायरी आहे. ग्रुपचे सर्व सदस्यांना यात सहभाग असल्याने मोफत जेवणाचे डबे पोचविण्यात मदत होत आहे. 
-सुधा काबरा, अध्यक्षा बॉक्‍स ऑफ हेल्प ग्रुप. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lunch tefine 60 year old man house dilivary box of help group