तरुणाईला लागले "पबजी गेम'चे वेड 

तरुणाईला लागले "पबजी गेम'चे वेड 

जळगाव : "पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला "ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा "गेम' खेळतात. "पबजी गेम'चे तरुणाईत इतके "फॅड' आहे की सध्याची तरुणाई सतत या गेममध्येच व्यस्त असते. बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत आहेत. आधुनिक युगात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. स्मार्टफोनमध्ये 24 तास इंटरनेट उपलब्ध असल्याने ऑनलाइन गेमची क्रेझ वाढली आहे. यामुळे लहान मुले अक्षरश: तहान भूक विसरूण या गेममध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. फक्त शहरी भागातच हे चित्र नसून ग्रामीण भागातही याचा ओढा वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांसोबत युवकही गेमच्या व्यसनात अडकत आहे. पबजी गेम हिंसकतेकडे झुकत असल्याने त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. गेम खेळून मुलांचा स्वभाव आक्रमक होत असल्याने आणि गेम खेळू न दिल्यास पालक आणि मुलांमधील नात्याला ठेचही पोचत आहे. तसेच, अभ्यास व खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. चहाची टपरी असो की कॉलेजचे 
पार्किंग किंवा मैदान असो सगळ्याच ठिकाणी मोबाईलवेडी तरुणाई चर्चेचा विषय ठरत आहे. मागील वर्षी ब्ल्यू व्हेल गेमने पालकांमध्ये दहशत माजवली होती. त्यानंतर पोकेमॉन गेममध्ये तहान-भूक विसरून तरुण पोकेमॉनच्या शोधात वणवण भटकत होते. गेमच्या नावाखाली अनेक किशोरवयीन मुलांचे बळीही गेले होते. त्यामुळे पालक सतर्क झाला. पण शाळा कॉलेज किंवा प्रवासात पालक मुलांबरोबर नसतात. त्यावेळी मात्र मुले पुन्हा या स्मार्टफोनच्या मोहजालात गुरफटत आहेत. मोबाइलवर एकाग्र चित्ताने खेळला जाणारा खेळ मुलांना अभ्यासापासून, कुटुंबापासून व एकूणच दैनंदिन कार्यातून वेगळे करतो. सतत "गेम' खेळल्याने डोळ्यांचे आजार होत आहेत. गेममधून हिंसक प्रवृत्ती मनावर लादल्याने मुले हिंसक होतात. छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही ते हिंसक वृत्ती दाखवतात. घरामध्ये आई-बाबांसोबत चिडून बोलणे, भावंडांसोबत मारामारी करणे, वडीलधाऱ्या माणसांना उद्धट बोलणे, असे प्रकार यामुळे वाढतात. एकूणच मुलांची शिक्षणातील बौद्धिक पातळी या गेममुळे खालावत चालली आहे. 
 
मी आधी वेगवेगळे "गेम' खेळत होतो. पण या गेममध्ये एक वेगळे थ्रील असल्याने मला हा गेम खूप आवडतो. सध्या माझ्या शाळेला सुटी असल्याने मी दिवसभर हाच "गेम' खेळतो. 
- ओम मराठे, विद्यार्थी 

या "गेम'मध्ये आकर्षक व्हिज्युअल्स आणि ऍक्‍शनचा समावेश असल्याने याकडे मुले लवकर आकर्षित होत आहेत. काही दिवसांपूर्वी या हिंसक खेळामुळे माझ्या मुलांच्या स्वभावात आक्रमकता वाढत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी व माझ्या कुटुंबातील सदस्यांनी आता एक ते दीड हजाराचे साधे मोबाईल वापरणे सुरू केले आहे. 
- प्रवीण जैन, पालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com