गीनिज रेकॉर्डसाठी डॉ. महाजन बंधूंचा गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजमध्ये सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नाशिक - मुंबई-चेन्नई-कोलकता-दिल्ली-मुंबई या भारतातील महामार्गांदरम्यानचे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे आव्हान रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) स्पर्धा विजेते डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन यांनी स्वीकारले आहे. गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजअंतर्गत सहा हजार किलोमीटर अंतर बारा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार ठेवला आहे. त्यांच्या या प्रवासाला रविवारी (ता. 18) सकाळी मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया येथून सुरवात होईल. बारा दिवसांच्या कालावधीत महाजन बंधूंपैकी कुणीतरी एक सतत सायकलवर स्वार राहील.

यापूर्वी जून 2015 मध्ये रॅम स्पर्धा जिंकत महाजन बंधूंनी भारताचा तिरंगा सातासमुद्रापार रोवला होता. आता गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजच्या माध्यमातून "नियमांची स्वीकृती.. भारताची उन्नती' असा संदेश डॉ. महाजन बंधू देणार आहेत. या संदर्भात डॉ. हितेंद्र महाजन म्हणाले, की रिले पद्धतीने आमच्यापैकी एकजण सायकलवर राहील, तर दुसऱ्या व्यक्‍तीसोबत संघाचे अन्य सदस्य कारमध्ये सोबत चालत राहतील. यादरम्यात गाडीतच खाणे-पिणे व झोपावे लागणार आहे. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम म्हणाले, की क्षमतेवर श्रद्धा आणि भविष्याकडे बघण्याचे धाडस प्रत्येकात असायला हवे. अशा प्रकारच्या स्पर्धांत सहभागी होताना शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक मानसिक क्षमतेची आवश्‍यकता असते. डॉ. महाजन बंधू रॅकॉर्ड प्रस्थापित करू शकतील, अशी मला खात्री आहे. डॉ. महेंद्र महाजन म्हणाले, की यापूर्वी अशा प्रकारचे आवाहन न्यूझीलंडमधील सायकलपटूने 24 दिवसांत पूर्ण केले होते; परंतु रिले प्रकारात अद्याप कुठल्याही विक्रमाची नोंद झालेली नाही. पाथर्डी फाटा येथे झालेल्या कार्यक्रमास नाशिक सायकलिस्टचे श्रीकांत जोशी, डॉ. श्‍वेता भिडे उपस्थित होते. या उपक्रमात महाजन बंधूंच्या संघात मितेन ठक्‍कर (प्रशिक्षक), डॉ. नितीन रौंदळ, किशोर काळे, राहुल ओढेकर (तांत्रिक सहाय्य), साकेत भावसार, शुभम देवरे, नाना फड, जगदीश शास्त्री, मिलिंद वाळेकर, मोहिंदर सिंग, डॉ. श्‍याम चौधरी यांचे पाठबळ मिळते आहे.

"फेसबुक'वर अपडेट्‌स
गार्मिन जीपीएस या उपकरणाद्वारे सायकल चालवताना गती, वेळ, ठिकाण आदींबाबतच्या नोंदी रेकॉर्ड करून ठेवल्या जाणार आहेत. गीनिज बुकात नोंदणीसाठी या रेकॉर्डचा उपयोग केला जाईल. महाजन बंधूंच्या प्रवासाच्या अपडेट्‌स http://www.facebook.com/Dr-Mahajan-Brothers-Cyclists-1683908261920999/ या फेसबुक पेजद्वारे क्रीडाप्रेमींना मिळविता येणार आहेत.

वातावरणाचे आव्हान
सायकल चालवताना महाजन बंधूंना उत्तर भारतातील थंडी, धुक्‍यामुळे वातावरणाचे आव्हान असेल. फॉग लॅम्सद्वारे धुक्‍यातून रस्ता काढला जाईल. दुसरीकडे, भारतात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने वाहतुकीतील अडथळ्यांचेही आव्हान असेल.

गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजमध्ये प्राणायामसोबत न्याय तंत्राचा वापर करणार आहोत. भविष्यात रेक ऍक्रॉस इंडिया घेण्याचा मानस असून, त्यासाठी हा उपक्रम उपयुक्‍त ठरेल.
- डॉ. हितेंद्र महाजन

Web Title: Mahajan brothers