'आयएमए'च्या 'मिशन पिंक हेल्थ' महाराष्ट्र शाखेचे मुंबईत आज उद्‌घाटन 

Maharashtra Branch of Mission Pink Health of IMA inaugurated today in Mumbai
Maharashtra Branch of Mission Pink Health of IMA inaugurated today in Mumbai

धुळे - देशात प्रत्येक राज्य, गाव आणि शाळेत टआयएमए'तर्फे राबविण्यात येत असलेल्या टमिशन पिंक हेल्थ' या उपक्रमांतर्गत 70 हजार किशोरवयीन मुलींची तपासणी, तर सहा महिन्यात तीन लाख मुलींचे समुपदेशन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात वीस हजार मुलींची अॅनिमियाबाबत तपासणी आणि उपचार झाले. सरासरी एक लाख मुलींचे प्रबोधन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर टमिशन'च्या राज्य शाखेचे मुंबईत आज (शुक्रवारी) उद्‌घाटन होत आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) किशोरवयीन मुलींसंबंधी टमिशन पिंक हेल्थ' या राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांतर्गत राज्यातील शाखेचे सकाळी साडेअकराला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईतील न्यू मरिन लाइन्स येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये उद्‌घाटन होईल, असे टआयएमए'च्या राज्य सचिव, टमिशन पिंक हेल्थ'च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. विजया माळी यांनी सांगितले. टआयएमए'ची राज्य शाखा, मुंबईस्थित रोटरी क्‍लबतर्फे हा कार्यक्रम होत आहे. टआयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. बी. एम. इनामदार, सनातन मोदी प्रमुख पाहुणे असतील. 

मुलींचे स्वास्थ जोपासणार -
'मिशन पिंक हेल्थ' राज्यात सात वर्षांपासून सुरू आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. अॅनिमिया (रक्तक्षय) निवारण आणि किशोरवयीन मुलींचे स्वास्थ यावर आधारित हा उपक्रम आहे. डॉ. रवी वानखेडकर यांच्या पुढाकाराने या वर्षापासून 'मिशन पिंक हेल्थ'ची राष्ट्रीय विंग स्थापन झाली. बेटी बचाओ- बेटी पढाओ, मुक्त भारत, 'आवो गाव चले'चे कार्य करताना 'मिशन पिंक हेल्थ' ही शाखा किशोरवयीन मुलींच्या आरोग्य हितासाठी बांधील आहे. निरोगी, व्यसनमुक्त, सक्षम व खंबीर युवा पिढीची निर्मिती, सुदृढ माता, पर्यायाने माता व बाल मृत्यूच्या दरात घट करणे आदी उद्देशाने कार्य केले जात आहे. 
 
मिशनचे असे कार्य -
'मिशन पिंक हेल्थ'मध्ये रक्तक्षयाला प्रतिबंध, शारीरिक, मानसिक व लैंगिक स्वास्थ, समुपदेशन, बेटी बचाओ- बेटी पढाओ याबाबत जागृती, मासिक पाळीतील आरोग्य, सोशल मीडियाचा दुष्परिणाम, योग्य-अयोग्य स्पर्शाची जाण, लैंगिक शोषणाला प्रतिबंध, महिला सशक्तीकरणावर भर दिला जात आहे. तसेच हिमोग्लोबिन तपासणी, तज्ञ डॉक्‍टरांकडून आरोग्य तपासणी, हेल्थ कार्ड वाटप, डॉ. विजया माळी निर्मित दृकश्राव्य सीडी 'मी किशोरी'द्वारे समुपदेशन, प्रश्‍नोत्तराद्वारे शंका निरसन, प्रश्‍नावलीद्वारे माहिती संकलन, पोस्टर्सद्वारे प्रबोधन, हेल्थ किट वाटप, आर्यन आणि फोलीक अॅसिड गोळ्या वाटप, 'मी किशोर' माहिती पुस्तिका, गरजू संस्थाना सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर व बर्नर वाटप केले जात आहे. 'आयएमए'चे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ. जयेश लेले, मुंबई शाखेच्या सचिव डॉ. सुजातून निस्सा, डॉ. विजय पंजाबी, डॉ. होजी कपाडिया, डॉ. चारुदत्त शिंदे, नर्गीस गौर आदींचे सहकार्य लाभत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com