#SpecialReport :राज्यातील २००२ च्या राजकीय बंडाचे नाशिककरांना स्मरण 

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 25 November 2019

राज्यातील सत्तानाट्यामुळे नाशिककरांना सरकारवरील २००२ मधील अविश्‍वास प्रस्तावाच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय बंडाचे स्मरण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अन्‌ उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सरकारच्या विरोधात नारायण राणे यांनी अविश्‍वास प्रस्तावाचे जुगाड जुळवले. त्यात तत्कालीन आमदार शिरीष कोतवाल, प्रशांत हिरे, ए. टी. पवार, ऍड. अनिल आहेर यांची नावे चर्चेत आली. विमानाने बेंगळुरूमध्ये रवाना झालेल्या आमदारांमध्ये हिरे,  पवार, ऍड. आहेर पाहायला मिळाले. 

नाशिक : राज्यातील सत्तानाट्यामुळे नाशिककरांना सरकारवरील २००२ मधील अविश्‍वास प्रस्तावाच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय बंडाचे स्मरण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अन्‌ उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सरकारच्या विरोधात नारायण राणे यांनी अविश्‍वास प्रस्तावाचे जुगाड जुळवले. त्यात तत्कालीन आमदार शिरीष कोतवाल, प्रशांत हिरे, ए. टी. पवार, ऍड. अनिल आहेर यांची नावे चर्चेत आली. विमानाने बेंगळुरूमध्ये रवाना झालेल्या आमदारांमध्ये हिरे,  पवार, ऍड. आहेर पाहायला मिळाले. 

राजभवनात कोकाटे, बनकर, झिरवाळ उपस्थित अन्‌ पवार पोचले गोटात 

बेंगळुरूमधील हॉटेल गोल्डन पाममध्ये राज्यातील 2002 मधील सत्ताधारी आमदारांना हलवण्यात आले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजभवानातील शपथविधी सोहळ्यास सिन्नरचे आमदार ऍड. माणिकराव कोकाटे, निफाडचे दिलीप बनकर, दिंडोरी-पेठचे नरहरी झिरवाळ यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपस्थितांमध्ये समावेश होता. त्या वेळी उपस्थित नसलेले पण पाठीमागून गेलेले कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार विधिमंडळ गटनेते अजित पवारांच्या निरोपानुसार मुंबईत गेले आणि त्यांचे नाव मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणाऱ्या विमानाच्या तिकिटांच्या यादीत नाशिककरांना बघावयास मिळाले. दरम्यान, 2002 मध्ये आघाडी सरकारविरुद्ध आणण्यात आलेल्या अविश्‍वास प्रस्तावावेळी श्री. राणे यांनी अपक्षांसह राष्ट्रवादीच्या आमदारांना गळाला लावले होते. आमदारांना एकत्र ठेवलेल्या तंबूतून तत्कालीन आमदार पद्माकर वळवी निसटले आणि अविश्‍वास प्रस्तावाचा डाव विसकटला. हा सारा पट नाशिककरांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. 

उपचारासाठी कोतवाल रुग्णालयात 

या राजकीय घडामोडी सुरू असतानाच 2002 मध्ये कोतवाल यांना त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे छायाचित्र त्या वेळी पुढे आले होते. आता राजभवनातील अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर श्री. बनकर थेट ऍपेंडिक्‍सची शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या मुलाला पाहण्यासाठी थेट नाशिकच्या कौशल्य रुग्णालयात पोचले होते. विशेष म्हणजे, ए. टी. पवार अविश्‍वास प्रस्तावाच्या राजकीय घडामोडीत सहभागी न होता, तत्कालीन आघाडी सरकारच्या समर्थनार्थ पोचले होते. आता मात्र त्यांचे पुत्र नितीन पवार यांनी विधिमंडळ गटनेत्याच्या गोटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ते हरवल्याची तक्रार त्यांच्या मुलाने शनिवारी (ता.23) रात्री नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र झिरवाळ हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिली. 

Image may contain: 2 people, people sitting and text

सत्तासंघर्षातील बंडातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधील फाटाफुटीचे लोण

नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत फाटाफुटीच्या पोचलेल्या लोणची परंपरा राज्यातील सत्तासंघर्षातील बंडातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधील फाटाफुटीचे लोण नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोचल्याची परंपरा यानिमित्ताने पुढे आली आहे. यापूर्वीच्या नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेपासून पंचायत समित्यांमध्ये झालेल्या फाटाफुटीतून विरोधकांना बाजी मारणे सोयीचे झाले आहे. 

No photo description available.

पहाटे मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो...

आघाडी सरकारच्या 2002 मधील अविश्‍वास प्रस्तावासाठी फुटलेल्या आमदारांमध्ये आपले नाव चर्चेत आले होते. त्या वेळी कायदेशीर बाजू तपासल्या आणि स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी एकतृतीयांश आमदारांची आवश्‍यकता असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले होते. मी पहाटे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निवासस्थान गाठले. मग सुरक्षेसाठी आमदारांना हलविण्यात आले. त्या वेळी एखादी चूक आपल्यापुरती मर्यादित नसते, ती राज्यासाठी असते, हे ध्यानात घेऊन दमदार पाऊल उचलले होते. त्याची आठवण आजही होते.

- ऍड. अनिल आहेर (माजी आमदार, नांदगाव) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government 2002 Political Nashik Marathi News