महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसाठी 18ला मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

आयएमए, प्रगती पॅनेलमध्ये सरळ लढत
नाशिक - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतंत्र प्रगती पॅनेल तयार करण्यात आले असून, नऊ जागांसाठी प्रत्येक विभागीय क्षेत्रामधून पॅनेलकडून उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या रविवारी (ता. 18) मतदान होणार आहे.

"एमएमसी'मध्ये पारदर्शकता आणणे हे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून अपेक्षित असताना त्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर कुठलीही ठोस उपाययोजना झाली नाही, यांसारख्या अनेक प्रश्‍नांवर काहीच करण्यात न आल्याने येणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र अशा प्रगती पॅनेलची स्थापना करण्यात आली. यामुळे आयएमए पुरस्कृत व प्रगती पॅनेल पुरस्कृत उमेदवारांमध्ये 18 पैकी नऊ जागांसाठी लढत होणार आहे.

प्रगती पॅनेलकडून डॉ. पिनाकपानी दंडे (नागपूर), डॉ. शरद घाटगे (सांगली), डॉ. अभय कदम (लातूर), डॉ. सुधीर नाईक (मुंबई), डॉ. नीलेश निकम (नाशिक), डॉ. जिग्नेश ठक्कर (मुंबई), डॉ. अविनाश येलीकर (औरंगाबाद) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रगती पॅनेलला वैद्यकीय विकास मंच, असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स, इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशन, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन, नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन व एमएसएमटीए या संघटनांचा पाठिंबा आहे. राज्यातील सुमारे 88 हजार डॉक्‍टरांपैकी 65 हजार डॉक्‍टर मतदान करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Maharashtra Medical Council to vote for the 18