चाळीसगावात कांद्याला 3,800चा विक्रमी भाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

चाळीसगाव - येथील बाजार समितीत आज झालेल्या लिलावात शिंदी येथील अनिल आवारे यांच्या उन्हाळ कांद्याला 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. दिवसभरात बाजारात तब्बल 110 ट्रॅक्‍टर कांद्याची आवक झाली असून, सातत्याने आवक वाढत असल्याने कांदा लिलावासाठी स्वतंत्र उपबाजार सुरू करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवारात आज भाजीपाला लिलावाच्या परिसरात ट्रॅक्‍टर व कांद्याच्या वाहनांच्या आज रांगा लागल्या होत्या. लिलावाच्या दिवशी शंभर ट्रॅक्‍टरपेक्षा अधिक वाहने येत असल्याने गेल्या महिन्यात कांद्याच्या लिलावात 43 हजार क्विंटल कांद्याची आवक नोंदविण्यात आली होती.

चाळीसगाव - येथील बाजार समितीत आज झालेल्या लिलावात शिंदी येथील अनिल आवारे यांच्या उन्हाळ कांद्याला 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. दिवसभरात बाजारात तब्बल 110 ट्रॅक्‍टर कांद्याची आवक झाली असून, सातत्याने आवक वाढत असल्याने कांदा लिलावासाठी स्वतंत्र उपबाजार सुरू करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवारात आज भाजीपाला लिलावाच्या परिसरात ट्रॅक्‍टर व कांद्याच्या वाहनांच्या आज रांगा लागल्या होत्या. लिलावाच्या दिवशी शंभर ट्रॅक्‍टरपेक्षा अधिक वाहने येत असल्याने गेल्या महिन्यात कांद्याच्या लिलावात 43 हजार क्विंटल कांद्याची आवक नोंदविण्यात आली होती. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेजारच्या तालुक्‍यातील कांदाउत्पादक शेतकरी कांदा विक्रीस आणत आहेत. 

सर्वाधिक अडतीसशेचा भाव  
कांद्याच्या भावात उतार-चढाव होत असला, तरी तीन हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव येथील कांदा लिलावात शेतकऱ्यांना मिळत आहे. जुना व लाल रंगाचा कांदा लिलावात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहे. बाजारात किरकोळ विक्रीसाठी कमी भाव असला, तरी चांगल्या कांद्याला इतर राज्यातून प्रचंड मागणी असल्याने तो खरेदी होताच लागलीच प्रतवारी करून व्यापारी परराज्यात पाठवीत आहेत. गेल्या लिलावात 3500 ते 3600 चा भाव होता, तो आजच्या या तेजीमुळेच 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला.

Web Title: maharashtra news onion Chalisgaon