भुसावळच्या इतिहासात सावकारेंची हॅट्रीक : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भुसावळ ः येथील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय सावकारे विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांनी पूर्वीचा आपलाच विक्रम मोडीत काढत भुसावळच्या इतिहासात सलग तीन वेळा निवडून येत त्यांनी हॅट्रीक साधली. 

भुसावळ ः येथील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय सावकारे विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांनी पूर्वीचा आपलाच विक्रम मोडीत काढत भुसावळच्या इतिहासात सलग तीन वेळा निवडून येत त्यांनी हॅट्रीक साधली. 
भुसावळ विधानसभा मतदार संघातून एकुण बारा उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत तिरंगी होती. भाजपचे आमदार संजय सावकारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगन सोनवणे, अपक्ष उमेदवार डॉ. मधु मानवतकर यांचे पती डॉ. राजेश मानवतकर हे सुरवातीपासुनच मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. नऊ वाजेनंतर पहिल्या फेरीचा निकाल आला. यात सावकारे यांना तीन हजार 959 मतांची आघाडी मिळाली. पुढे 23 व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत विजय संपादन केला. त्यांना गेल्यावेळेस 87 हजार 818 मते मिळाली होती. यात त्यांनी 34 हजार 637 मतांनी विजय मिळविला होता. यंदा हा विक्रम त्यांनी मोडीत काढत 54 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला. 2009 च्या निवडणुकीत संजय सावकारे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. यानंतर त्यांनी गेल्या निवडणुकीत म्हणजे 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळविला होता. यंदा देखील त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगन सोनवणे हे तिसरा स्थानावर राहिले. विजय निश्‍चित झाल्यानंतर फटाक्‍यांची आतिशबाजी, ढोलताशे वाजवत एकमेकांवर गुलाल उधळण्यात येत होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results bhusawal histry sanjay savkare win