चाळीसगाव : भाजपचे मंगेश चव्हाण विजयी : Maharashtra VIdhan Sabha 2019 election results

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपकडून नवीन उमेदवार दिलेले मंगेश चव्हाण यांनी भाजपचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळाले. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख हे 4 हजार 100 मतांनी पडले. 

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपकडून नवीन उमेदवार दिलेले मंगेश चव्हाण यांनी भाजपचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळाले. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख हे 4 हजार 100 मतांनी पडले. 
चाळीसगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या विरूद्ध भाजपचे मंगेश चव्हाण यांची लढत होती. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांच्यावर 4 हजार  100 मतांनी विजय प्राप्त केला. या निवडणुकीत भाजपच्या मंगेश चव्हाण यांना 85 हजार 69 तर राजीव देशमुख यांना 80 हजार 969 मते प्राप्त झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या पाच फेऱ्यामध्ये राजीव देशमुख यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र मंगेश चव्हाण यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोरसिंग राठोड यांना 38 हजार 360 मते प्राप्त झाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले. मंगेश चव्हाण यांनी शेवटच्या फेरीत 4 हजार 100 मतांची आघाडी घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.

मतमोजणी दरम्यान आक्षेप 
मतमोजणी सुरू असताना 16 व्या फेरीअखेर भाजपचे मंगेश चव्हाण यांना 61 हजार 306 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांना 57 हजार 11 मत मिळाली आहे. चव्हाण यांनी आघाडी कायम राखली असून, मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादीचे देशमुख व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी कक्षात जावून मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत गोंधळ घातला. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढत मतमोजणी सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results chalisgaon BJP mangesh chavan win