चाळीसगाव : राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा मतमोजणीवर आक्षेप : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

चाळीसगाव ः चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील मतमोजणी कक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी गोंधळ घातला. मतमोजणी प्रक्रियेबाबत त्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. 

चाळीसगाव ः चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील मतमोजणी कक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी गोंधळ घातला. मतमोजणी प्रक्रियेबाबत त्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. 
चाळीसगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या विरूद्ध भाजपचे मंगेश चव्हाण यांची लढत होती. सुरवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये देशमुख यांची आघाडी होती. तिसऱ्या फेरीनंतर मंगेश चव्हाण यांनी आघाडी मोडीत काढत पुढे कायम ठेवली. आतापर्यंत झालेल्या 16 व्या फेरीअखेर भाजपचे मंगेश चव्हाण यांना 61 हजार 306 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांना 57 हजार 11 मत मिळाली आहे. चव्हाण यांनी आघाडी कायम राखली असून, मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादीचे देशमुख व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी कक्षात जावून मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत गोंधळ घातला. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढत मतमोजणी सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results chalisgaon ratjiv deshamukh

टॅग्स
टॉपिकस