एरंडोल- पारोळा : शिवसेनेचे चिमणराव पाटील विजयी : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

एरंडोल : विधानसभेच्या एरंडोल- पारोळा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सतीश भास्करराव पाटील यांचा १८ हजार २ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

एरंडोल : विधानसभेच्या एरंडोल- पारोळा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सतीश भास्करराव पाटील यांचा १८ हजार २ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दादासाहेब पाटील महाविद्यालयात सकाळी आठपासून सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील यांनी आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांनी आघाडी कायम ठेवली. पंधराव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मतमोजणी प्रतिनिधी मतदान केंद्रातून निघून गेले. शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील यांनी आघाडी घेतल्याचे जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राजवळ गर्दी करून जल्लोष सुरू केला. यावेळी ढोल, ताशे वाजवून व फटाके फोडून भाजप- शिवसेनेचे पदाधिकारी विजयोत्सव साजरा करीत होते. १०९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील एक मशीन बंद पडल्यामुळे व्हीव्ही पॅटच्या मदतीने या केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी शिवसेनेचे चिमणराव पाटील विजय झाल्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमधील उत्साह अधिकच वाढत होता. आमदार चिमणराव पाटील यांची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी त्यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. तसेच महिलांनी औक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण अर्पण करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results erandol parola sena chimanrao patil win