जामनेर ः जलसंपदा मंत्री महाजन 18 हजार मतांनी पुढे : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

जामनेर ः राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकतर्फी विजयी आघाडी कायम राखली आहे. मंत्री महाजन यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीचे संजय गरूड यांच्या विरूद्ध 18 हजार 573 मतांनी आघाडी घेतली आहे. 

जामनेर ः राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकतर्फी विजयी आघाडी कायम राखली आहे. मंत्री महाजन यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीचे संजय गरूड यांच्या विरूद्ध 18 हजार 573 मतांनी आघाडी घेतली आहे. 
जिल्ह्यातील जामनेर मतदार संघात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पारंपारीक प्रतिस्पर्धी निवडणुकीत मिळाले होते. राष्ट्रवादीचे संजय गरूड यांनी महाजन यांच्या विरूद्ध प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करत असतात. यावर्षीच्या निवडणुकीत देखील त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुक एकतर्फी मानली जात होती. शिवाय, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी यंदाची निवडणुक ही वर्चस्वाची लढाई मानली जात होती. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात गरूड यांनी मतदार संघात हवा करत गिरीश महाजन मतदार संघात ठाण मांडून ठेवण्यास भाग पाडले. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून एकतर्फी निकालाचे चित्र स्पष्ट होत असून, गिरीश महाजन यांनी आतापर्यंत 45 हजार 541 मत मिळविले आहेत. तर संजय गरूड यांना 26 हजार 968 मत मिळाली असून, महाजनांनी 18 हजार 573 मतांची आघाडी घेतली आहे. आघाडी घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष करण्यास सुरवात केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results girish mahajan jamner sanjay garud