रावेर : कॉंग्रेसने खाते उघडले; शिरीष चौधरी विजयी : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

रावेर ः रावेर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी हे पंधरा हजारापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी आमदार आणि राज्याच्या कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा पराभव केला. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मधुकरराव चौधरी यांच्यानंतर या मतदार संघात कोणताही आमदार सलग दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करू शकला नाही ही परंपरा यावेळीही ही या मतदार संघाने कायम राखली आहे. 

आज सकाळी ठीक आठ वाजता येथील तहसीलदार कार्यालयात चौदा टेबलवर मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीचा निकाल साडेआठ वाजेच्या सुमारास घोषित झाला यात शिरीष चौधरी यांना 1 हजार 753 मतांची आघाडी मिळाली आणि त्यानंतर सर्वच 23 फेऱ्यांमध्ये श्री चौधरी आघाडीवर राहिले. मध्यंतरी काही फेऱ्यात श्री चौधरी यांची आघाडी काहीशी कमी झाली परंतु श्री जावळे किंवा अनिल चौधरी यापैकी कोणीही त्यांच्या मतदानापेक्षा जास्त मते घेऊ शकले नाही. तिसऱ्या फेरीत श्री चौधरी यांचे आघाडी सात हजार 295 पर्यंत गेली; तर तेराव्या फेरीअखेर दहा हजाराचा आकडा ओलांडून 11 हजार 431 पर्यंत वाढली होती. सतराव्या फेरीत श्री. चौधरी यांनी पंधरा हजारापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती. आणि इथेच निवडणुकीचा निकाल निश्‍चित झाला होता. श्री. चौधरी यांची आघाडी वाढू लागताच येथील बाजार समिती समोरील रस्त्यावर आणि प्रांगणात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या बाकी असतानाच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी श्री. चौधरी यांचे अभिनंदन केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results raver shirish choudhari win