Vidhan Sabha 2019 : ‘राष्ट्रवादी’कडून सतीश घुले यांना उमेदवारी

Satish Ghule nomination from NCP
Satish Ghule nomination from NCP

विधानसभा 2019

भुसावळ -  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभेचे चार उमेदवार जाहीर केले. त्यापाठोपाठ भुसावळ मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांनी सतीश घुले या युवा उद्योजकाच्या नावाची घोषणा करून रणशिंग फुंकले.

शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात ग्रामीण कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी पत्रकार परिषद घेऊन अॅड. पाटील व संतोष चौधरी यांनी श्री. घुले यांच्या नावाची घोषणा करुन धक्कातंत्राचा वापर केला आहे. श्री. घुले हेही चर्मकार  समाजाचेच असल्याने आमदार सावकारे यांना तोडीस तोड ठरतील. 

यावेळी श्री. चौधरी म्हणाले, की शहरात दहा वर्षापुर्वीचे रस्ते आहेत, मात्र पाच वर्षापूर्वीचे वाहून गेले. या कामांमध्ये ३५ टक्के वाटप असल्याने दर्जाहीन झाली आहेत. शहरात इतके खड्डे आहेत की, हे मोजून देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस मी देण्याचे जाहीर केले. 

तसेच साई संस्थानच्या माध्यमातून गांधी नगरमध्ये सुसज्ज हॉस्पिटल उभारणार, येथे सर्व उपचार मोफत होतील. पहिली ते दहावीपर्यंत एक हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण 

देणार, दोन पाण्याचे टॅकर, रुग्णवाहिका सुविधा देणार असे सांगून विद्यमान आमदार व पालिकेच्या कामाचे वाभाडे त्यांनी काढले. 

सतीश घुले यांची उमेदवारी ही पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच निश्चित झाली असल्याने, अडचणीचा प्रश्नच नाही असेही श्री. चौधरी यांनी सांगितले. 

यावेळी अरविंद मिनकरी, ललित बागूल, उमेश नेमाडे, उल्हास पगारे, नितीन धांडे, माधुरी पाटील, सचिन चौधरी, रवींद्र पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, सचिन पाटील, राहुल बोरसे, अशोक चौधरी, बाळु गोलांडे, नाना पवार आदी कार्यकर्ते सभागृहात उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com