नवप्रकाश योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये अंधारच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

तीन लाखांपैकी जेमतेम 11 हजारांचे अर्ज

नाशिक: थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब थकबाकीदार वीजग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी "महावितरण'ने नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेच्या पुरेशा प्रसिद्धीअभावी परिमंडळातील तीन लाख दहा हजारापैकी जेमतेम 11 हजार ग्राहकांनी नवप्रकाश अंतर्गत वीज वीजकनेक्‍शनसाठी अर्ज केले. त्यामुळे ही चांगली योजना "महावितरण'नेच अंधारात ठेवली आहे.

नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस, रिकनेक्‍शन शुल्कात पूर्ण सवलत देण्यात आली आहे. तसेच, ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज नाही. वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत आहे. नवप्रकाश योजनेचा सहा महिन्यांचा कालावधी असून, पहिल्या तीन महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम 100 टक्के माफ होणार आहे. योजनेच्या पुढील तीन महिन्यांत व सहा महिन्यांपर्यंत मूळ थकबाकी आणि 25 टक्के व्याज भरल्यास 75 टक्के व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे. "महावितरण'च्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे.

तीन कोटी वसुलीनंतर
जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद ठरविल्यानंतर वीजबिल भरण्यासाठी मात्र कंपनीने जुन्या नोटा स्वीकारण्याची सवलत दिली होती. तीन कोटींच्या आसपास जुना भरणा नाशिक परिमंडळात भरला गेला. थकबाकी भरण्यासाठी लोक पुढे आले; पण बंद असलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही. कंपनीच्या अंदाजानुसार साधारण तीन लाख दहा हजारांवर वीजग्राहकांना लाभ घेता येणे शक्‍य आहे; पण महिनाभरात जेमतेम 11 हजारांच्या आसपास अर्ज आले आहेत.

Web Title: mahavitaran navprakash yojna