Vidhan Sabha 2019 : युतीला मिळतील 'इतक्या' जागा; गिरीश महाजनांना विश्वास

Girish-Mahajan-Family
Girish-Mahajan-Family

जळगाव : ''राज्यात युतीला अनुकूल वातावरण आहे, जनतेत मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. राज्यात पुन्हा युती सरकार आणावयाचे आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीला 210 ते 215 जागा मिळतील,'' असा विश्‍वास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मतदान केंद्रावर गिरीश महाजन यांनी पत्नी नगराध्यक्ष साधना महाजन, कन्या प्रिया आणि श्रेयासोबत मतदान केले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, 'पावसामुळे शेतकरी, शेतमजूर घरीच आहेत, त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का निश्‍चित वाढणार आहे.' 

युतीच्या विजयाबाबत महाजन म्हणाले की, राज्यात युतीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. जनतेत मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. त्यांना पुन्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावयाचे आहे. त्यामुळे युतीला यावेळी स्पष्ट बहुमत मिळेल. उत्तर महाराष्ट्रात 47 जागांपैकी युतीला 38 ते 40 जागा निश्‍चित मिळतील. विरोधकांना दहा ते बाराच्यावर जागा मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com