न्याय न मिळाल्यास बँकेच्या दारातच करेन आत्महत्या

जगन्नाथ पाटील
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

महेंद्र पाटील हे कांदा उत्पादक शेतकरी आहे. कांदा लागवड करणे हा त्यांचा छंद आहे. गेल्या पाच वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने पुरते कर्जबाजारी झाले आहेत. आजही भाव मिळेल या आशेने उन्हाळी कांदा चाळीत सडत आहे. बँक आॅफ महाराष्र्टने कर्जमाफीचे पत्र पाठविले. त्यासाठी 75 हजार आधी भरावे लागतील असे सांगितले; व्याजाने पैसे उचलून भरलेही. माफीचे दीड लाख पाटील यांना मिळालेच नाहीत.

कापडणे (ता.धुळे) : 
"मीच माझे रचतोय सरण
शेतकरी मरावा हेच धोरण
उरल्या आशा मावळल्या
बँकेने नाडविले मजला"

अशी अवस्था येथील कांदा उत्पादक शेतकरी महेंद्र यशवंत पाटील यांची झाली आहे. दीड लाखाचे कर्ज माफीचे पत्र बँकेने दिले. त्यासाठी 75 हजाराची रोख रक्कमही भरायला लावली. दीड लाख जमा झालेत. अन ते परस्पर कांदाचाळीच्या कर्जात वर्ग करुन घेतलेत्. 75 हजार व्याजाने उचलले आहेत. आता ते कसे फेडावेत, ही भ्रांत आहे. मला न्याय न मिळाल्यास बँक आॅफ महाराष्र्टाच्या दारात केव्हाही विषप्राशन करुन आत्महत्या करेन ; असे पत्रच बँकेला धाडल्याने बँकेचे कर्मचारी पाटील यांचा शोध घेत  आहेत.

महेंद्र पाटील हे कांदा उत्पादक शेतकरी आहे. कांदा लागवड करणे हा त्यांचा छंद आहे. गेल्या पाच वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने पुरते कर्जबाजारी झाले आहेत. आजही भाव मिळेल या आशेने उन्हाळी कांदा चाळीत सडत आहे. बँक आॅफ महाराष्र्टने कर्जमाफीचे पत्र पाठविले. त्यासाठी 75 हजार आधी भरावे लागतील असे सांगितले; व्याजाने पैसे उचलून भरलेही. माफीचे दीड लाख पाटील यांना मिळालेच नाहीत. तपास केल्यानंतर समजले. कांदाचाळीच्या कर्जात पैसे वर्ग झालेत. वास्तविक चाळीचे अनुदान मिळाल्यावर कर्ज निरंक होते. असा प्रताप बँकेने केल्याने पाटील हतबल झाले आहेत. त्यांनी बँकेच्या येथील शाखेला आत्महत्येचे पत्र पाठविले आहे. कोणत्याही क्षण बँकेच्या दारात मृत्यृ झाल्याचे आढळेल. यास तुमचे धोरणच कारणीभूत असेल असेही नमूद केले आहे.

दरम्यान धुळे तालुक्यात  महिन्याभरापासून पाऊस नाही. पिके करपायला लागली आहेत. सलग चौथ्या वर्षी पिकस्थिती गंभीर झाली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title: Mahendra Patil loan issue in Dhule