माहूरला श्री रेणुकादेवीची सप्तफळांची आरासपूजा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

माहूर - राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर श्री रेणुकादेवीची चैत्र नवरात्र नवमीनिमित्त सप्तफळांनी आरासपूजा करण्यात आली.

माहूर - राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर श्री रेणुकादेवीची चैत्र नवरात्र नवमीनिमित्त सप्तफळांनी आरासपूजा करण्यात आली.

चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गडावर सात दिवसांपासून विविध कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. आज संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी, विश्‍वस्त भवानीदास भोपी यांनी देवीची पूजा करून महाआरती केली. आरतीनंतर छबिना काढण्यात आला. सायंकाळी पूर्णाहुती सोहळ्याने चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता झाली.

Web Title: mahur news shri renukadevi pooja