आपल्यावर संशय नको म्हणून ती सतत मालकाच्या संपर्कात होती...पण शेवटी तीच निघाली प्लानची मास्टरमाईंड

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

व्यावसायिक प्रीतपालसिंग बलवीरसिंग बग्गा त्यांच्या कुटुंबीयांसह अमृतसर येथे शनिवारी (ता.16) रात्री साडेअकराच्या सुमारास देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी (ता.24) दुपारी घरी परतले असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. भद्रकाली पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता, बग्गा कुटुंबीय बाहेरगावी जाणार असल्याची माहिती केवळ त्यांची मोलकरीण दीपाली साठे हिलाच असल्याचे पोलिसांना समजले.

नाशिक : एन. डी. पटेल रोडवरील भाजप कार्यालयास लागूनच असलेल्या चंदन बंगल्यावरील चोरीचा भद्रकाली पोलिसांनी 12 तासांत छडा लावला. मोलकरीणच दरोड्याची मास्टर माइंड निघाली असून, तिचा मेव्हणा आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने तिने दरोड्याचा कट रचला. पोलिसांच्या प्रयत्नाने त्यांचा कट फसला. 

भद्रकाली पोलिसांनी 12 तासांत छडा लावला.

व्यावसायिक प्रीतपालसिंग बलवीरसिंग बग्गा त्यांच्या कुटुंबीयांसह अमृतसर येथे शनिवारी (ता. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी (ता. 24) दुपारी घरी परतले असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. भद्रकाली पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता, बग्गा कुटुंबीय बाहेरगावी जाणार असल्याची माहिती केवळ त्यांची मोलकरीण दीपाली साठे हिलाच असल्याचे पोलिसांना समजले. तिची रविवारी चौकशी करून सोडून दिले. मात्र तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वराडे, भद्रकाली गुन्हे शाखा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विजय जोनवाल आणि कर्मचाऱ्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. संशयास्पद हालचालीवरून सोमवारी सकाळी पुन्हा तिची चौकशी केली असता, तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. 

हेही वाचा > टोपी उतरवून शर्ट इन केला...अन् गुरगावच्या आलिशान हॉटेलमधून 'हे' आमदार पडले बाहेर.... 

मोलकरणीसह तिघांना अटक 
तिचा मेव्हणा राजू ऊर्फ जुनेद शेख (वय 35, रा. पंचशीलनगर) यांच्या घरात चोरीचा कट रचला. मित्र बाबू शेख (वय 27, रा. भारतनगर) याच्या मदतीने रविवारी चोरीचा कट आखला. रात्री बंगल्याच्या जिन्यासमोरील जाळीस असलेल्या खड्ड्यातून बंगल्यात प्रवेश केला. कडीकोयंडा तोडून कपाटातून सुमारे 11 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, सात लाखांची रोख, असा सुमारे 18 लाखांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी तपासचक्र फिरवत 12 तासात दीपाली साठे हिच्यासह बाबू शेख, राजू ऊर्फ जुनेद शेख अशा तिघांना अटक केली. त्यांना सोमवारी (ता. 25) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दोन संशयितांच्या घरातून सुमारे दोन लाख 35 हजारांची रोख, तसेच सुमारे 11 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 13 लाखांचा ऐवज जप्त केला. 

"ती' सतत संपर्कात 
आपल्यावर संशय बळावू नये यासाठी मोलकरीण दीपाली साठे इंद्रपालकौर बग्गा यांच्याशी सतत मोबाईलद्वारे संपर्कात होती. बग्गा कुटुंबीय कधी परतणार, सध्या कुठे आहे याची माहिती तिच्याकडून घेत होती. जेणेकरून तिच्यावर कुणाचा संशय जाणार नाही, याची काळजी तिने घेतली. 16 तारखेपासून तर 24 तारखेच्या सकाळपर्यंत तिने अनेक वेळा संपर्क केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 
 

फोटो पाहा व वाचा > "ती' विवाहित, तरीही ती तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या प्रेमात पडली..अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maid was Mastermind of a robbery Nashik Crime News