सिम स्वाइप प्रकरणातील मुख्य हॅकरही गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक - बॅंक खाते हॅक करून त्यानंतर खातेदाराच्या मोबाईलचे सिमकार्ड हॅक करून सीम स्वाइपप्रकारे 37 लाखांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुख्य हॅकरलाही नाशिक सायबर पोलिसांनी कुर्ला (मुंबई) येथून अटक केली. विशाल विकास शाह ऊर्फ अभिजित सिंकदर असे मुख्य संशयिताचे नाव असून, गेल्या 3 ऑगस्टला दोघांना मुंबईतून अटक केली होती. राज्यातच नव्हे, तर देशभरात सीम स्वाइपद्वारे कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीस प्रथमच नाशिक सायबर पोलिसांनी अटक केली. 

विशाल विकास शाह ऊर्फ अभिजित सिकंदर (रा. कुर्ला, मुंबई) असे मुख्य संशयिताचे नाव आहे. नाशिक सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवराज बोरसे यांनी दोन आठवड्यांपूर्वी सीम स्वाइप गुन्ह्याचा तपास करताना दोघांना मुंबईतून अटक केली होती. परंतु मुख्य संशयित हाती लागला नव्हता. गेल्या मंगळवारी (ता. 14) संशयित विशाल शाह कुर्ल्यात असल्याची माहिती हाती लागताच सायबर पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. त्यास 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयिताकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. 

सतीश उत्तमराव पाटील (रा. सायखेडा रोड) या ठेकेदाराला गेल्या वर्षी 25 ऑगस्टला या संशयितांनी ऑनलाइन पद्धतीने 37 लाखांना गंडा घातला होता. संशयितांनी पाटील यांचे बॅंक ऑफ बडोदातील खाते हॅक केले आणि त्यानंतर या खात्याशी जोडलेला आयडिया कंपनीचा मोबाईल क्रमांक हॅक केला. हा मोबाईल क्रमांक हरवल्याची खोटी तक्रार कस्टमर केअरला देत त्याच क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड घेत त्यावर आलेल्या ओटीपी क्रमांकावरून पाटील यांच्या खात्यावरून ऑनलाइन 37 लाखांची रक्कम वेगवेगळ्या बॅंक खात्यावर वळती केली होती. सिम स्वाइपचा पहिलाच गुन्हा नाशिक सायबर पोलिसांत दाखल झाल्यापासून पोलिस निरीक्षक देवराज बोरसे या तपासात होते. गेल्या 31 जुलैला संशयित दिवाकर रमाकांत राय (वय 29, रा. कृष्णाई अपार्टमेंट, दिवा, जि. ठाणे) यास अटक केली. त्यानंतर तांत्रिक माहितीआधारे केरळमध्ये विमानाने जाण्याच्या प्रयत्नात असलेला संशयित हबीब अजीज चौधरी (वय 33, रा. ट्रायसिटी इन्क्‍लेव्ह, सेक्‍टर 9, नवी मुंबई) याला अटक केली होती. 

संशयित अत्यंत चलाख अन्‌ गुन्ह्याचा तपासही अत्यंत किचकट होता. टोळी जेरबंद केल्याचे समाधान आहे. 
- देवराज बोरसे, पोलिस निरीक्षक,  सायबर पोलिस ठाणे 

Web Title: main hacker arrested in the SIM swipe case