मालेगाव मतमोजणीची  प्रशासकीय तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मालेगाव - महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीची मतमोजणी आज (ता. २६) सकाळी दहापासून सुरू होणार आहे. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल जाहीर होऊ शकतील. सर्वांत कमी मतदान झालेल्या प्रभाग १० व २० मधील निकाल दुपारी बारापर्यंत अपेक्षित आहेत. मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी होणाऱ्या पाचही केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात आली आहे. शुक्रवार सुटीचा दिवस असल्याने विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महापालिकेच्या २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यातील प्रभाग १९ क मधील जागा बिनविरोध झाली. त्यामुळे ८३ जागांसाठी काल मतदान झाले. बुधवारी ४४.४ अंश सेल्सिअस तापमान असतानाही उत्साहात ६० टक्के मतदान झाले. ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. प्रभागातील प्रत्येक जागेवर काट्याची लढत होत आहे. पूर्व भागातील बुलंद एकबाल व इश्‍तियाक अहमद या (पै.) निहाल अहमद यांच्या पुत्रांमधील लढतीकडे शहराचे लक्ष लागून आहे. पश्‍चिम भागातील प्रभाग ११ ड मध्ये ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे शालक जयराज बच्छाव व भाजपचे महानगराध्यक्ष सुनील गायकवाड यांचे बंधू मदन गायकवाड यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. पूर्व भागात काँग्रेस वरचढ ठरते की राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पश्‍चिम भागात शिवसेना की भाजप याबाबतही उत्सुकता आहे. अकरा राजकीय पक्षांबरोबरच १०१ अपक्षांनी निवडणूक प्रचारात घाम गाळला आहे.

Web Title: malegaon election malegaon municipal corporation