महापालिकेच्या अंदाजपत्रकात  ‘स्थायी’ने सुचविले उत्पन्नवाढीचे स्रोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मालेगाव - महापालिकेचे २०१७-१८ चे ३७८ कोटी ९९ लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर समितीने दोन दिवस चर्चा केली. जवळपास सहा कोटी रुपये उत्पन्नवाढीच्या बाबी सुचविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी अडीचशे कर्मचारी वाढवून एक कोटी रुपयांचा ठेका प्रशासनाने सुचविला होता. समितीने ही रक्कम अडीच कोटी केली आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतर अंदाजपत्रक महासभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.

आयुक्त रवींद्र जगताप यांनी स्थायी समितीचे सभापती एजाज बेग यांना २०१७-१८ चे ४४ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले होते. अंदाजपत्रकावर सलग दोन दिवस स्थायी समितीत चर्चा झाली. समितीने जवळपास सहा कोटी रुपये उत्पन्नवाढीच्या बाबी सुचविल्या आहेत. प्रशासनाने जाहिरात कर १५ लाख रुपये गृहीत धरला होता. समितीने तो ३६ लाख केला आहे. ओएफसी केबलपोटी ५० लाख उत्पन्नावरून ते एक कोटी २० लाख सुचविले आहे. टाऊन हॉलभाडे सात लाख ६० हजार प्रशासनाने गृहीत धरले असून, समितीने गाळे हस्तांतर बाकी असल्याने हे उत्पन्न ५० लाखांपर्यंत अपेक्षित मानले आहे. मंगळवार वॉर्ड भागात उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलापोटी ६० ऐवजी ६५ लाख रुपये उत्पन्न सुचविले आहे. याखेरीज स्लॉटर हाउसपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ सुचविण्यात आली आहे. शहरात स्वच्छतेचा प्रश्‍न नेहमीच अग्रभागी राहतो. त्यामुळे स्वच्छतेसाठी अडीचशे कर्मचाऱ्यांचा ठेका देऊन त्यासाठी एक कोटी रुपये खर्च प्रशासनाने सुचविला होता. समितीने यात वाढ करून हा खर्च अडीच कोटी अपेक्षित धरला आहे. स्थायी समितीने सुचविलेल्या बदलासह अंदाजपत्रक महासभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.

Web Title: Malegaon Municipal Budget