सप्तशृंगगडावर भाविक तीन मिनिटांत पोचणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मालेगाव - आदिमायेच्या सप्तशृंगगडावर देशातील पहिला फ्युनिक्‍युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे काम दृष्टिक्षेपात आले असून, शासनाकडून अंतिम "ना हरकत' प्रमाणपत्राची आता प्रतीक्षा आहे. ट्रॉली सुरू होण्यास साधारणत: महिन्याचा कालावधी लागू शकतो. बदललेली डिझाईन, वाढलेली कामे, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत करण्यात आलेल्या उपाययोजना यामुळे हा प्रकल्प तब्बल सहा वर्षे लांबला. ट्रॉलीमुळे श्रद्धाळूंना अवघ्या तीन मिनिटांत भगवतीच्या मंदिरात जाता येईल. शिवाय अंध, अपंग, दिव्यांग व वृद्धांना या ट्रॉलीचा फायदा होणार आहे.

डोंगरकपारीत असलेल्या भगवतीच्या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पाचशे पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे या प्रकल्पाची कल्पना पुढे आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत हे काम नागपूर येथील सुयोग गुरबक्‍साणी फ्युनिक्‍युलर रोपवेज ही कंपनी प्रकल्पाचे काम करीत आहे. युरोप तंत्रज्ञान वापरून युक्रेनच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. प्रकल्पाचा खर्च 31.43 कोटींवरून 110 कोटींवर गेला आहे. सरकारने या प्रकल्पाला तीन वर्षे चार महिने मुदतवाढ दिली आहे.

Web Title: malegaon nashik news funicular trolley on saptashrungigad