अवैध वाळू वाहतूक करणारे 9 ट्रक जप्त; 16 लाख दंड अपेक्षित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

मालेगाव - चाळीसगाव तालुक्‍यातील तापी नदीतून विनापरवाना व ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे नऊ ट्रक महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. 19) जप्त केले. चाळीसगाव फाटा व सौंदाणे शिवारातील हॉटेल फाउंटनजवळ ही कारवाई करण्यात आली. ट्रकमध्ये अंदाजे 60 ब्रास वाळू आहे. जप्त केलेल्या वाळूवर पाचपट दंड आकारला जाईल. यातून 16 लाखांचा दंड अपेक्षित आहे. पथकाने दगड व वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्‍टर जप्त केले. 

महसूल विभागाने अवैध गौणखनिजाविरोधात मोहीम उघडली आहे. यासाठी प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तापी नदीतून वाळू वाहतूक करणारे ट्रक एमएच 18- बीजी 8351, एमएच 15- एजी 7241, एमएच 15- एफक्‍यू 7077, एमएच 18-एपी 7171, एमएच 18-एए 1314, एमएच 15- सीके 9677, एमएच 18- बीए 1330, एमएच 15- बीजे 7241, एमएच 04- एचवाय 4591 हे महामार्गावरील चाळीसगाव फाटा व सौंदाणे शिवारात जप्त करण्यात आले. सर्व वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. पथकाने दगड वाहून नेणारा ट्रॅक्‍टर (एमएच 41- 5080) व बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर (एमएच 41- एए 7504) जप्त केला. दोन्ही ट्रॅक्‍टरमध्ये एक ब्रास गौणखनिज होते. 

Web Title: malegaon news illegal sand transport seized chalisgaon