महादेव घाटावर आज श्री हरिहर भेट उत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मालेगाव - शहरातील प्राचीन व ऐतिहासिक महादेव घाटावरील महादेव मंदिरात व नजीकच्या गणेश कुंडाजवळ वैकुंठ चतुर्दशीनिमित्त आज (ता. २) रात्री बाराला श्री हरिहर भेट उत्सव होणार आहे. यानिमित्त मंदिर व परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. मंदिर परिसरात रोषणाई व पताका लावण्याचे काम  सुरू आहे. 

यानिमित्त महादेव मंदिरातील पिंडीला पारंपरिक मुखवटा चढविण्यात येईल व फुलांची आरास केली जाईल. मंदिराच्या कळसापर्यंत पाण्यातले दिवे लावून रोषणाई केली जाणार असल्याची माहिती श्री महादेव सेवा समितीचे पंकज मुंदडा, रमेश मंडाळे यांनी दिली. श्री हरिहर भेट उत्सव म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू व महादेव यांचे वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री बाराला मिलन होत असते. महादेव घाटावरील महादेव सेवा समितीतर्फे हा उत्सव साजरा होतो. गुरुवारी दुपारी साडेचार ते साडेसहा दरम्यान सत्संग, महिला भजनी मंडळाचे  भजन होईल. 

सायंकाळी छपन्न भोग श्री महादेवाला अर्पण करण्यात येतील. महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम होईल. संपूर्ण परिसर दिव्यांनी सजविण्यात येईल. पिंडीला मुखवटा चढवून फुलांची आरास करण्यात येईल. रात्री दहा ते बारादरम्यान राजस्थानी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. रात्री बाराला हरिहर भेट, आरती व प्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे महादू मंडाळे, प्रवीण बच्छाव, राजेश बाजपेयी यांनी केले आहे. 

कार्यक्रमासाठी विवेक वारुळे, कृष्णा पाटील, खेमचंद तलरेजा, संतोष जाधव, सचिन जाधव, हेमंत चौधरी, राजेंद्र येवले, संजय संन्याशिव, पंकज कोठावदे, गणेश फुलदेवरे, कैलास सोनवणे, मोनिश परदेशी, शिवाजी देवरे, भारत वाफेकर, महेश गुरव आदी प्रयत्नशील आहेत.

Web Title: malegaon news mahadev ghat

टॅग्स