मालेगावमध्ये स्पष्ट बहुमत नाही; काँग्रेसला 28 जागा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नसल्याचे दिसून आले आहे. मालेगावमधील एकूण 84 जागांपैकी काँग्रेसला 28 तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दलाच्या आघाडीला 26 जागा मिळाल्या आहेत.

पनवेलमध्ये स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेने 13 आणि एमआयएमने 7 जागा मिळविल्या आहेत.

मालेगाव मनपा निवडणूक निकाल वैशिष्ट्ये

  • ट्रिपल तलाक मुद्यावर मुस्लिम महिलांची सहानुभूती मिळवण्याचा भाजपचा प्रयोग पूर्ण फसला
  • भाजपला नऊ जागा, एकही मुस्लिम विजयी नाही
  • शिवसेनेच्या जागा वाढल्या. पूर्वी 11 जागा मिळाल्या होत्या. यंदा 2 जागांची वाढ
  • काँग्रेस 28 जागांसह सर्वांत मोठा पक्ष. तथापी सत्ता स्थापन करणे अवघड
  • राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल आघाडी 26 अधिक एक पुरस्कृत अपक्ष
  • राष्ट्रवादी-जनता दल आघाडी, शिवसेना, एमआयएम एकत्र येऊन काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची शक्‍यता
Web Title: malegaon news, malegaon election, panvel election, panvel news, bhiwandi news, election results, corporation election result