मालेगाव विशेष विकास निधी आराखड्यासाठी आज बैठक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मालेगाव - महापालिकेला राज्य शासनातर्फे दोन वर्षांच्या कार्यकाळात प्रारंभी आठ कोटी व नंतर पाच कोटी असा दोन वेळा १३ कोटींचा विशेष विकास निधी देण्यात आला. मात्र, विशेष विकास निधीतून करावयाची कामे निश्‍चित न झाल्याने या निधीचा आराखडा मंजुरी लांबणीवर पडली. आज (ता. २४) नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष विकास निधी आराखडा मंजुरीसाठी त्रिसदस्यीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.

विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त अशी तीन सदस्यीय समिती महापालिकेने विशेष विकास आराखड्यासाठी सुचविलेल्या कामांना मंजुरी देते. गेली अडीच वर्षे तत्कालीन महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांनी पाठपुरावा न केल्याने ही कामे खोळंबल्याचा आरोप महापौर रशीद शेख यांनी केला होता. श्री. शेख गेले काही दिवस यासाठी पाठपुरावा करीत होते. त्यास यश आले आहे. श्री. झगडे यांच्या आदेशानुसार आज या संदर्भात बैठक होणार आहे. प्रभारी आयुक्त अजय मोरे या बैठकीसाठी काल सायंकाळी रवाना झाले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज  दुपारी बाराला बैठक होणार आहे. शहर अभियंता कैलास बच्छाव व संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित राहतील. अंतिम मंजुरी त्रिसदस्यीय समिती देईल. शासनाच्या विशेष विकास निधीतून रस्ते, उद्यान, सुशोभीकरण, गिरणा नदीजवळील परिसराचे सुशोभीकरण व ग्रीन बेल्ट विकसित करणे अशा काही प्रमुख कामांचा यात समावेश आहे. सत्तारूढ व विरोधी सदस्यांनी वेगवेगळी कामे सुचविल्याने हा निधी  वादात होता.

Web Title: malegaon news malegaon municipal