विशेष विकास निधीच्या आठ कोटींच्या कामांना मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मालेगाव - महापालिकेला राज्य शासनातर्फे प्राप्त आठ कोटी विशेष विकास निधीतून प्रस्तावित असलेल्या 58 विविध विकासकामांपैकी सुशोभीकरण व वॉलकंपाउंडची सहा कामे वगळता 52 वेगवेगळ्या विकासकामांना आज नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष विकास निधी आराखडा मंजुरीच्या त्रिसदस्यीय समिती सभेत मंजुरी देण्यात आली. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पाच कोटी विकास निधीतून प्रस्तावित असलेले गिरणा नदीचे सुशोभीकरण, संरक्षक भिंत, उद्यान या कामाचा प्रकल्प आराखडा व प्रस्तावात दुरुस्ती सुचवत फेरप्रस्ताव सादर करण्याचे महापालिका प्रशासनाला आदेश दिले. 

राज्य शासनातर्फे दोन वेगवेगळ्या टप्प्यांत मिळालेल्या 13 कोटींचा विशेष विकास निधीतील कामांचा आराखडा मंजुरीसाठी आज नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात त्रिसदस्यीय समितीची सभा झाली. विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी महापालिका आयुक्त अजय मोरे आदी समितीचे तीन सदस्य, महापालिका शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता संजय जाधव आदी उपस्थित होते. सभेत आठ कोटी विकास निधीतील रस्ते कॉंक्रिटीकरण, हॉटमिक्‍स रस्ते, नाले बांधकाम, गटार कामे, सामाजिक सभागृह, पेव्हर ब्लॉक, जिमखाने, वाचनालय यासह पूर्व-पश्‍चिम भागातील विविध प्रभागांतील 52 कामांना मंजुरी देण्यात आली. समितीकडून प्रस्तावित कामांची यादी प्राप्त होताच निविदा काढून ही कामे तातडीने सुरू करण्यासाठी सूचना देण्यात येतील, असे महापौर रशीद शेख यांनी सांगितले. प्रलंबित असलेल्या या कामांसाठी श्री. शेख यांनी पाठपुरावा केला होता. 

Web Title: malegaon news melgaon municipal