रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच शिवसेना नेत्याचे दारूचे दुकान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

गेल्या महिन्यातच मंत्री भुसे यांच्या पुढाकाराने या रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये निधी उपलब्ध झाला. नूतनीकरणाचे उद्‌घाटन नुकतेच झाले. मात्र, शिवसेनेच्या नेत्यानेच बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दारू दुकान सुरू केल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत

मालेगाव - शहराचे व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मोसमपूल भागातील महिला व बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच शिवसेना नेत्याने देशी-विदेशी मद्यविक्रीचे दुकान सुरू केले आहे.

या दुकानामुळे परिसरातील व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला असून, दुकान अन्यत्र न हलवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या व्यापारी गाळ्यातच हे दुकान सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिन्यातच मंत्री भुसे यांच्या पुढाकाराने या रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये निधी उपलब्ध झाला. नूतनीकरणाचे उद्‌घाटन नुकतेच झाले. मात्र, शिवसेनेच्या नेत्यानेच बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दारू दुकान सुरू केल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत. परिसरातील व्यावसायिकांनी हे दुकान हलवण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, मंत्री भुसे यांना दिले आहे.

 

Web Title: malegaon news: shiv sena hospital