तलाक न देता दुसरा विवाह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मालेगाव - पहिल्या पत्नीला तलाक दिला नसताना दुसरा बेकायदा निकाह करणाऱ्या औरंगाबाद येथील मजहर खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एम. डी. कांबळे यांनी दिले. येथील माहेरवाशीण असलेल्या शाहीनबानो यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पवारवाडी पोलिसांना हा आदेश दिला. 

शाहीनबानो हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील मजहर खान याच्याशी झाला होता. या दांपत्यास चार अपत्ये झाल्यानंतर मजहरने शाहीनबानोकडे रकमेची मागणी करत तिला घरातून हाकलून दिले. यानंतर मजहरने रुक्‍साना नावाच्या महिलेशी फतेहपूर (ता. जामनेर) येथील जामा मशिदीत काझीमार्फत बेकायदा विवाह केला. तशी नोंद जामा मशिदीमध्ये करण्यात आली होती. अन्याय झाल्याने शाहीनबानोने न्यायालयात दाद मागितली. शाहीनबानोतर्फे वकील मनोज पवार यांनी युक्तिवाद केला. 

मुस्लिम पर्सनल कायद्यतील तरतुदीमध्ये मुस्लिम पुरुषाला एका वेळी चार महिलांशी निकाह करता येतो. त्यासाठी आधी निकाह केलेल्या पत्नीची संमती घेणे आवश्‍यक असते. तसेच पूर्वीच्या पत्नीपासून अपत्य होऊ शकत नसतील किंवा पत्नी गंभीर आजारी असेल व ती शारीरिक सुख देऊ शकत नाही, अशी विशेष कारणे आवश्‍यक आहेत. यापैकी कोणतेही कारण नसताना व कोणताही तलाक दिलेला नसताना मजहर खानने दुसरा बेकायदा विवाह केला. शाहीनबानोची फसवणूक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून मजहर खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

Web Title: malegaon news talaq crime