मालेगाव तालुक्‍यातील गट-गणांसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मालेगाव - राज्यात जिल्हा परिषद व महापालिकांसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, मालेगाव व सिन्नरमध्ये हे दोन मित्रपक्षच प्रामुख्याने समोरासमोर असल्याने येथे युती नको, असा नारा देत भाजपने मालेगाव तालुक्‍यातील सात गट व 14 गणांसाठी 60 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. माजी मंत्री प्रशांत हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्यासह आठ पदाधिकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या. 

कॅम्प भागातील लोकनेते व्यंकटराव हिरे सभागृहात या मुलाखती झाल्या. सात गटांसाठी 24, तर 14 गणांसाठी 40 इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. दुपारी एक ते सहादरम्यान मुलाखती झाल्या. माजी मंत्री श्री. हिरे, जिल्हाध्यक्ष जाधव यांच्यासह श्री. पवार, युवा नेते अद्वय हिरे, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, भाजपचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड, पवन ठाकरे, संदीप पाटील, काशीनाथ पवार, भिकन शेळके आदींनी मुलाखती घेतल्या. 

इच्छुक उमेदवारांना गट-गणातील समस्या जाणून घेतल्या का?, उमेदवारीपूर्वी जनमत घेतले का, गट-गणाची सामाजिक भौगोलिक स्थिती, समस्या कोणत्या, यापूर्वी विजयी झालेल्या उमेदवारांच्या कामाबद्दल काय अभ्यास केला. गट-गणात कोणती विकासकामे करणार, पक्षाचे काम केव्हापासून करतात, सक्रिय सभासद आहेत का, तुम्हाला उमेदवारी का द्यावी, राजकीय-सामाजिक-आर्थिक पार्श्‍वभूमी आदी प्रश्‍न प्रामुख्याने विचारण्यात आले. भाजपचे गटातील तीन-चार उमेदवार जवळजवळ निश्‍चित झाले आहेत. मुलाखतीसाठी गट-गणातील इच्छुक व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मुलाखतींचा अहवाल प्रदेश समितीला पाठविला जाणार आहे.

Web Title: Malegaon taluka interviews of aspirants BJP