मालेगावचा पारा 37.6 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मालेगाव - शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून कडक ऊन पडत आहे. कालच्या तुलनेने आज तापमानात थोडी घट झाली. आज येथे 37.6 अंश एवढे तापमान नोंदले गेले. काल (ता. 27) पारा 41 अंशांवर पोचला होता. उन्हाळा सुरू झाल्याने शहरात चौकाचौकांमध्ये तसेच ग्रामीण भागात मुख्य रस्त्यांलगत शीतपेय व रसवंतीची दुकाने थाटली आहेत. येथील प्रसिद्ध मसाला ताक विक्रीची दुकाने कॅम्प रोडवर चार दिवसांपासून लावली जात आहेत. बर्फाचे गोळे व कूल्फी विक्रेतेही गल्ली-मोहल्ल्यांमध्ये हातगाड्यांवर व्यवसाय करीत आहेत. 

Web Title: Malegaon temperature 37.6 degrees Celsius