मालेगावचा पारा 42.6 अंशावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मालेगाव: शहर व परिसरात गेल्या दहा दिवसापासून पारा 40 अंशावर आहे. बुधवारच्या तुलनेने पारा आज (ता. 4) एका अंशाने वाढला. आज येथे 42.6 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले गेले आहे.

आज सकाळी अकरापासूनच कडक ऊन पडले होते. दुपारी साडेतीन नंतर वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण तयार झाल्याने नागरिकांना हायसे वाटले. वातावरणात झालेल्या बदलामुळे बेमोसमी पाऊस होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात उन्हाळी कांदा काढणीचे काम सुरु आहे. समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा शेतातच आहे. काहींनी तो चाळींमध्ये भरुन ठेवला असल्याने वातावरणामुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे.

Web Title: Malegaon Tempreture at 42.6 degree selicous