डाळिंब व्यापाऱ्याचा पत्नीकडून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मालेगाव - येथील रमजानपुरा भागातील अक्‍सा कॉलनी भागातील मोहंमदी टॉवरमधील सज्जाद आलम बशीर (वय 35, मूळ रा. किराया, जि. पाटणा, बिहार) या डाळिंब व्यापाऱ्याचा पत्नीने धारदार शस्त्राने वार करून खून केला. गुरुवारी (ता. 15) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पहाटे खून झाला असल्याची शक्‍यता आहे. सज्जादची दुसरी पत्नी नाजिया घरातून लाखो रुपयाची रोकड घेऊन फरारी आहे. तिच्यावरच खुनाचा संशय आहे. नाजियाने पहिला पती अथवा प्रियकराच्या मदतीने हा खून केला असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली.
Web Title: malegav news nashik news murder crime