स्नेहसंमेलनातून शेतकरी आत्महत्या व स्वच्छतेचा जागर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सटाणा - भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा वार्षिक गुणगौरव व स्नेहसंमेलन कार्यक्रम सप्तपदी मंगल कार्यालयात पार पडला. चिमुकल्यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'स्वच्छ भारत अभियान' नाटिकेतून स्वच्छतेचा केलेला जागर, शेतकरी आत्महत्या, देशभक्तीपर गीते हे विशेष आकर्षण ठरले.

सटाणा - भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा वार्षिक गुणगौरव व स्नेहसंमेलन कार्यक्रम सप्तपदी मंगल कार्यालयात पार पडला. चिमुकल्यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'स्वच्छ भारत अभियान' नाटिकेतून स्वच्छतेचा केलेला जागर, शेतकरी आत्महत्या, देशभक्तीपर गीते हे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष सन्माननीय रामचंद्रबापु पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सोनु कोठावदे, मोना एज्युकेशन संस्थेचे संस्थापक डॉ.दौलतराव गांगुर्डे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार, प्रगतीशील शेतकरी केदा भामरे, कृष्णा भामरे, रवींद्र भामरे, केंद्रप्रमुख हेमलता धोंडगे, नरेंद्र आहिरे आदी उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे सुरु असलेले काम कौतुकास्पद असल्याचे रामचंद्र बापू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांसोबत कलामंच ट्रस्टतर्फे घेण्यात आलेली तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, प्रत्येक इयत्तेतील आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक तसेच व सामान्यज्ञान विजेता शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या 'आईची दैनंदिनी' या उपक्रमाच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या प्रत्येक इयत्तेतील एका मातापालकाला 'आदर्श माता' म्हणून गौरविण्यात आले.  

प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुरेश येवला यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविल्या जाणाऱ्या आईची दैनंदिनी, विनादप्तर शाळा, संगणक ज्ञान, अक्षर लेखन, स्पर्धा परिक्षांची तयारी, क्रिडास्पर्धा आदी उपक्रमांची माहिती दिली. 

कार्यक्रमास बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदकिशोर शेवाळे, गुरुकुल स्कूलचे संस्थापक जितेंद्र अहिरे, प्रा. किरण दशमुखे, एड. सोमदत्त मुंजवाडकर, प्रमोद रौंदळ, बी. के. पाटील, किरण सोनवणे, रोशन खैरनार, काशिनाथ डोईफोडे, तुषार जाधव, भगवान आहेर, साहेबराव खैरनार, सजन देवरे, आबा शिंदे, किरण पवार, ए. बी. गातवे, जी. आर. दातरे, वाय. एस. घोडे, एस. के. पवार, आर. आर. सुर्यवंशी, एम. जे. रौदळ, डी. डी. अहिरे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. पी. जे. सुर्यवंशी व शेखर अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. तर नंदकिशोर अहिरे यांनी आभार मानले.

Web Title: malhar hil school gathering