नाशिक जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्येत पुन्हा वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

नाशिक - जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली ग्रामबालविकास केंद्रे बंद केल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पाच हजारांचा टप्पा देखील जिल्ह्यातील बालकांकडून ओलंडण्यात आला आहे. सदस्यांकडून वारंवार मागणी केल्यानंतर म्हणून महिला व बालविकास विभागाकडून अवघे 314 ग्रामबालविकास केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील तीव कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येने पंधरा हजारांचा टप्पा गाठल्यानंतर आणि निती आयोगाने देखील जिल्हा राज्यात पहिल्या चारमध्ये असल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची खरी आकडेवारी जाणून घेत तातडीने संपूर्ण जिल्ह्यात जून महिन्यात दोन टप्प्यांत दोन हजारांहून अधिक ग्रामबालविकास केंद्रे सुरू केली.

Web Title: Malnutrition Child Increase in Nashik District