अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

जळगावः धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील अनुसूचित जातीची अल्पवयीन बालीका घरात एकटीच असताना गावातील कुणाल दशरथ पाटील (वय २२) याने घरात शिरून अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. चाळीसगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी बाललैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात संशयिताविरोध्द दोषारोप निश्चित होऊन जिल्हा न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

नववीत शिक्षण घेणारी पिंकी (काल्पनिक नाव) घरात एकटी होती. घटनेच्या दिवशी (३१ जुलै २०१७) दुपारी चारच्या सुमारास कुणाल दशरथ पाटील याने घराच्या मागील दार ठोकले. शेजारील मैत्रीण आली असावी, म्हणून पिंकीने दार उघडताच कुणालने पिडीतेला घरात ढकलून दार बंद करुन अतिप्रसंगाचा प्रयत्न करत असतानाच घराच्या पुढच्या दारातून पिडीतेची आई घरात आली. ते पाहून त्याने पळ काढला. घडला प्रकार पिडीतेने आईला सांगीतल्यावर पिडीतेसह कुटूंबायांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कुणाल पाटीस याला अटक करण्यात आली होती.

अवैध वाळू उपसा बेतला जिवावर

 अटकेनंतर डीवायएसपी अरविमद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास पुर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. न्या. आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते. प्राप्त दस्ताऐवज, साक्षीदारांच्या साक्ष, प्रत्यक्षदर्शी आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे सरकारी अभियोक्ता अॅड. निलेश चौधरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून संशयित कुणाल दशरथ पाटील याच्याविरूध्द  दोषारोप सिध्द झाले. पिडीतेसह सहा साक्षीदारांच्या महत्वपूर्ण साक्ष न्यायालयात नोंदवून घेण्यात आल्या. पैरवी अधिकारी शालिग्राम पाटील यांची सरकारपक्षाला मदत राहिली.

वरणगाव पालिकेत नगराध्यक्ष एकाकी

असे कलम, अशी शिक्षा 

  • कलम -२५४(अ), बालकाचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (२०१२) कलम – ०८ : ०३ वर्षे सश्रम कारावास १ रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना कैद
  • कलम – ४५२ : अनधिकारे घरात प्रवेश : ०१ वर्ष शिक्षा ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कैद
  • सुधारित अनुसूचित जाती जमाती अधिनियम (अॅट्रॉसिटी)च्या कलम ३,१, डब्लू. आय, २ अंतर्गत ६ महिने कारावास २०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस कैद
     
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man get imprisonment for Molesting a Minor Girl