
Nandurbar : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास 7 वर्ष सश्रम कारावास
नंदुरबार : शहरातील सिंधी कॉलनीत पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार (Torturing) करणाऱ्या नराधमास आरोप सिद्ध झाल्याने नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास (Rigorous imprisonment) व ५० हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Man sentenced to 7 years rigorous imprisonment for torturing a girl Nandurbar Crime News)
घटनेची माहिती अशी, नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनीत १८ मे २०२१ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच वर्षीय बालिकेस चॉकलेट खायचे असल्याने तिने तिच्या आईला सांगितले होते. तेव्हा आईने त्या मुलीस चॉकलेट घेण्यासाठी १० रुपये देवून घराजवळच असलेले अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याचे दुकानावर चॉकलेट घेण्यासाठी पाठविले होते. मुलगी २० मिनिटे होऊनही घरी न आल्याने तिची आई व वडिलांनी गल्लीत शोधत असताना मुलगी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याचे घराकडुन रडत येत होती. त्यावेळी पीडित मुलीस घरी नेऊन तिची तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे तिच्या आईस दिसून आले. त्यावेळी पीडित मुलीसह तिचे आई-वडिलांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याचेविरुध्द तक्रार दिली.
हेही वाचा: Nashik : बिटकोचे १५ दिवसात स्थलांतर
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . तसेच हा गुन्हा उपनगर पोलिस ठाणेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांनी गुन्हा तत्काळ दाखल करून आरोपीतास अटक केली. खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांचे कोर्टात होवुन आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याला न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .
हेही वाचा: कांदा निर्यातीतून 11 महिन्यात कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन
सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड . विजय चव्हाण व फिर्यादी पक्षातर्फे अॅड. पी. आर. जोशी यांनी पाहिले असून खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून नितीन साबळे, गिरीश पाटील यांनी कामकाज केले आहे .
Web Title: Man Sentenced To 7 Years Rigorous Imprisonment For Torturing A Girl Nandurbar Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..